पटोलेंनी भाजपला डिवचलं! निलंबित माजी आमदाराला दिली खुली ऑफर!

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंड झाले आहे.
पटोलेंनी भाजपला डिवचलं! निलंबित माजी आमदाराला दिली खुली ऑफर!
Charan Waghmare and Nana Patole latest Marathi NewsSarkarnama

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंड झाले. त्यामुळे अध्यक्षपदी काँग्रेसचे (Congress) गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या (BJP) फुटीर गटाचे संदीप टाले विजयी झाले. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा एक गट काँग्रेससोबत गेल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे वाघमारे यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. ही बातमी समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाघमारे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. (Nana Patole Latest Marathi News)

भाजप पक्ष श्रेष्टींचा आदेश झुगारून काँग्रेस सोबत गेल्यामुळे भाजपला सत्तेपासून दुर राहावे लागले. त्यामुळे वाघमारे यांना सहा वर्षाकरीता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. सोबतच तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची कार्यकारिणी रद्द करण्यात आली असल्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी मंगळवारी जाहीर केले. (Nana Patoles offer to Charan Waghmare)

Charan Waghmare and Nana Patole latest Marathi News
राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष

वाघमारे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पटोले यांनी भाजपला आणखी धक्के देण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसते. त्यात त्यांनी वाघमारे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर देत भाजपला डिवचले आहे. आम्हाला चरण वाघमारे यांच्यासारखा विकास पुरुष मिळेल, असे नांना पटोले यांनी वाघमारे यांना उद्देशुन म्हटले आहे. वाघमारे यांनी मात्र कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन करून पुढील भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करु नये, असे चरण वाघमारे यांनी सांगितले होते. भाजप, राष्ट्रवादी एकत्र आली तर आपण वेगळा विचार करु, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामुळे वाघमारे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Charan Waghmare and Nana Patole latest Marathi News
राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष

वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.