युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Amravati | Youth congress | Accident : मृत माजी खासदारांचा नातू, तर जखमी माजी आमदाराचा मुलगा
Amravati | Youth congress | Accident
Amravati | Youth congress | Accident Sarkarnama

अमरावती : अकोला-अमरावती रस्त्यावर दर्यापूरजवळ ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. रोहित अजय देशमुख (वय-२७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित देशमुखच्या पार्थिवावर आज (रविवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्व दुर्घटनाग्रस्त हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून युवक काँग्रेसचे (Amravati | Youth congress | Accident) सदस्य आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सर्व दुर्घटणाग्रस्त अकोला येथील युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला गेले होते. तिथून परत अमरावतीला येत असताना अकोला-अमरावती रस्त्यावर दर्यापूरजवळ आल्यानंतर रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आराळा येथे ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात रोहितचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतचे अन्य ५ जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून यातील दोघांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे.

Amravati | Youth congress | Accident
फडणवीसांच्या नोटिसीवरुन अजितदादा उद्विग्न; राजकीय नेत्यांना कानपिचक्या

अपघातातील मृत रोहित देशमुख हा अमरावतीचे तीन वेळचे खासदार कृष्णराव गुलाबराव देशमुख यांचा नातू असून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा समर्थक होता. रोहितचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा सभुचे माजी सरपंच होते. जखमीमध्ये युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पंकज मोरे सनी नावाचा युवक आणि वाहनचालक जखमी झाले आहेत. रोहितच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com