लिटमस टेस्टमध्ये कॉंग्रेस पास, सुनील केदारांनी सिद्ध केला दबदबा…

जिल्हा परिषदेच्या एकूण १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. यामध्ये कॉंग्रेसने ९ जागांवर विजय मिळविला. Congress won on 9 seats
Sunil Kedar, Congress
Sunil Kedar, CongressSarkarnama

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविल्यानंतर जिल्ह्याच्या १६ जिल्हा परिषद गटांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अपात्र ठरले. काल झालेली पोटनिवडणूक ही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांसाठी लिटमस टेस्ट होती. या टेस्टमध्ये कॉंग्रेस पास झाली आहे. या ‘रिझल्ट’चे श्रेय पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना दिले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. यामध्ये कॉंग्रेसने ९ जागांवर विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाने ३, राष्ट्रवादी २ तर शेकापने एका जागेवर आपली मोहोर उमटविली. शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. तेथे माजी महापौर संदीप जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि कॉंग्रेसचे अभिजित वंजारी आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच महाविकास आघाडीचा आत्मविश्‍वास दुणावला होता, तर भाजप थोडीशी का होईना नैराश्‍यात गेल्यासारखी दिसत होती.

आज लागलेल्या निकालाने भाजपमधील नैराश्‍य अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशिवाय इतर कुणीही सक्रिय दिसले नाही. नाही म्हणायला जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये बावनकुळेंच्या सोबतीला होते. पण त्यांचा प्रभाव या निवडणुकीत प्रचारादरम्यान कुठे बघायला मिळाला नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी एकट्यानेच हा किल्ला लढवला. एकीकडे बावनकुळे एकटे आणि दुसरीकडे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते मंत्री सुनील केदार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक. तरीही बावनकुळेंनी चांगली लढत दिली, असे त्यांचे विरोधकही आज खासगीत बोलत आहेत. हेसुद्धा बावनकुळेंसाठी यशापेक्षा कमी नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही बडा नेता नागपूर जिल्ह्यात फिरकला नाही. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे केदारांच्या खांद्याला खांदा लावून लढले. ही निवडणूक अंगावर घेतलेल्या सुनील केदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलेच पाठबळ दिले. ही या निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून लढली तर आजही विरोधकांना धूळ चारू शकते, हे सिद्ध करणारी ही पोटनिवडणूक ठरली, असे म्हटल्यास कुणालाही त्याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

Sunil Kedar, Congress
जिल्हा परिषद पोटनिवडणूक : नागपुर तालुक्यात कॉंग्रेसचा दणदणीत विजय

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल

०१) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस

०२) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस

०३) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस

०४) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस

०५) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस

०६) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस

०७) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस

०८) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस

०९) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस

१०) येनवा- समीर उमप- शेकाप

११) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी

१२) भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी

१३) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना

१४) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप

१५) सावरगाव - पर्वता काळबांडे- भाजप

१६) इससानी- अर्चना गिरी- भाजप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com