Congress News : "आम्ही चव्हाणांना जबरदस्ती करू..." ; केदारांचं वक्तव्य : प्रदेशाध्यक्षापदावरून काँग्रेस घमासान?

Congress News : चव्हाणांसाठी काँग्रेसमधील आमदार सक्रिय!
Congress News | Ashok Chavhan | Nana Patole
Congress News | Ashok Chavhan | Nana PatoleSarkarnama

Nagpur : विधानपरिषद निवडणुकींपासून काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते. नाशिक पदवीधर निवडणुकीवरून पक्षातील काही आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. याच दरम्यान ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. पटोले यांच्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. यानंतर काँग्रेसला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या ताज्या विधानामुळे अंतर्गत धुसफूस शिक्कामोर्तब झाले आहे.

काँग्रेसचे नेते बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुनील केदार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अभिजीत वंजारी, नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचे इतरही काही नेते उपस्थित राहिले होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना केदारांनी चव्हाणांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील केदार?

"अशोक चव्हाणांसारखा नेता हा मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमचे आधारस्तंभ आहेत. नेहमीच आम्ही त्यांच्याकडे मोठ्या श्रद्धेने पाहत आलोय, यापुढेही पाहत राहू. ते कितीही नाही बोलले, नकार दिला तरी ही आम्ही जबरदस्ती करूच.." केदार यांच्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चे होत आहे. सुनील केदार हे चव्हाणांना नेमक्या कशासाठी, कोणत्या पदासाठी जबरदस्ती करण्याबाबत भाष्य करत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करायची आहे का? पटोलेंना हटवून चव्हाणांसाठी आमदारांचा पाठिंबा देत आहेत का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

थोरातांना दिले होते समर्थन :

बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर केदार यांनी थोरातांना पाठिंबा दिला होता. त्यांनी पटोलेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. केदार म्हणाले होते, "तुम्ही कितीही मोठे झालात, आभाळ जरी गाठलं तरी पण थोरातसाहेबांबद्दल आदर करायला हवा."

अशोक चव्हाणांना यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याची चर्चा ही पहिल्यांदाच होत आहे असे नाही. काही दिवसांपूर्वी चव्हाण नाराज असल्याचे बातमी समोर आली होती. या दरम्यान, चव्हाणांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाईल, अशी चर्चा होतस होती. मात्र, भारत जोडो यात्रेत या चर्चा संपुष्टात आले होते. पण, आता केदार यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चा तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com