Congress News : कॉंग्रेसमधील ‘वन मॅन आर्मी’ची कसोटी, नाना पटोलेंच्या ‘त्या’आदेशाने भरली धडकी !

Nana Patole : गंभीर दखल प्रदेश कॉंग्रेसने घेतली आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसने ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनात तुरळक उपस्थिती होती. पक्षाचे अनेक पदाधिकारी आंदोलनस्थळी भटकलेच नाहीत. यांची गंभीर दखल प्रदेश कॉंग्रेसने घेतली आहे. (Regional Congress has taken serious notice.)

यापुढे आंदोलनात सहभागी न होणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. एवढेच नव्हे तर आंदोलनात कार्यकर्ते आणण्याचा ‘भार’ पदाधिकाऱ्यांना उचलावा लागणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेता म्हणून मिरविणाऱ्या ‘वन मॅन आर्मी’ पदाधिकाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सदैव एकटेच असणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना आता कार्यकर्ते आणायचे कुठून, अशी चिंता सतावत आहे.

कॉंग्रेसने राज्यातील, (Maharashtra) देशातील समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलन केली. मोर्चे काढले. परंतु या मोर्चात पदाधिकारीच येत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. आता राहुल गांधींवरील कारवाईनंतरसुद्धा बहुतांश पदाधिकारी सत्याग्रहात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी केवळ सत्याग्रहाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात आणि शहरात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.

अनेक वर्षांपासून पक्षाची पदे घेऊन नेत्यांच्या आजूबाजूला मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनात आणि मोर्चात सहभाग होणे कमीपणाचे वाटते, अशी स्थिती आहे. जे पदाधिकारी सहभागी होतात. त्यांच्या पाठीमागे कुणीच नसते. एकटेच येतात आणि एकटेच जातात. केवळ माध्यमांत चमकोगिरी करणे एवढाच त्यांच्या उपस्थितीचा अर्थ असतो. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनातील उपस्थितीची गंभीर दखल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.

Nana Patole
Nana Patole News : शिवधनुष्य यात्रा आणि राज ठाकरेंना भेटल्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांना भेटावे !

यासंदर्भात २६ मार्च २०२३ रोजी पटोले यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटींगद्वारे संवाद साधला. त्यावेळी आंदोलनातील उपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अपवादात्मक परिस्थिती वगळता सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती तातडीने प्रदेश कार्यालयाकडे पाठवा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले.

यापुढे होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात, आंदोलनात अथवा मोर्चांत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी किमान ४०, जिल्हा पदाधिकारी २० आणि ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी यांनी १० कार्यकर्ते सोबत आणणे बंधनकारक केले आहे. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार आपल्यासोबत कार्यकर्ते आणणार नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने पाठवावी. त्यामुळे त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल, असेही पटोले म्हणाले.

Nana Patole
Nana Patole News : नाना पटोले म्हणाले, आघाडी फुटणार नाही; कारण ‘तो’ विषय नव्हताच!

पटोले (Nana Patole) यांच्या या आदेशाने अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. वर्षानुवर्षे पांढरे शुभ्र कपडे घालून नेते म्हणून मिरविणाऱ्या कॉंग्रेसचे (Congress) अनेक पदाधिकारी केवळ एकटेच आहेत. एखाद्या मोठ्या नेत्यांची हुजरेगिरी करून ते पद मिळवितात आणि नेते म्हणून वावरतात. अशा ‘वन मॅन आर्मी’ची आता खरी कसोटी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com