Congress News : संभाजीनगरला दांडी मारणारे पटोले अन् नाराज राऊतही येणार, अंतर्गत वाद संपुष्टात !

Nagpur : सभेच्या आयोजनावरून नागपूरमध्ये चांगलेच वातावरण तापले होते.
Nana Patole, Sunil Kedar and Nitin Raut.
Nana Patole, Sunil Kedar and Nitin Raut.Sarkarnama

Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज सायंकाळी सहा वाजता दर्शन कॉलनी येथील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान सभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सभेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (Sambhajinagar beating Patole and angry Raut will also come)

वज्रमूठ सभेच्या आयोजनावरून नागपूरमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. दर्शन कॉलनीतील सभा रद्द करावी, असे भरपूर प्रयत्न झाले होते. उद्धव ठाकरे, अजित पवार येणार नाहीत, असेही बोलले जात होते. सुनील केदार यांनी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पुढे केल्याने काँग्रेसचा एक गट सभेच्या तयारीपासून लांब होता. मात्र आता महाविकास आघाडीच्या सभेवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद जवळपास संपुष्टात आले असल्याचे दिसून येते.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी नियोजनाची बैठक घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेला दांडी मारणारे नाना पटोले यांनी आपण सभेला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे सभेला येणार की नाही हा संभ्रमसुद्धा दूर झाला आहे. ठाकरे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत कालपासूनच ठाण मांडून बसले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सेनेचे नेते विनायक राऊत हेसुद्धा येऊन गेले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भातील (Vidarbha) सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. दर्शन कॉलनीतील पटांगणावरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे. न्यायालयाने सभेला परवानगी दिली आहे. अखेर आज ही सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेचा विक्रम नागपुरातील सभा मोडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nana Patole, Sunil Kedar and Nitin Raut.
Mahavikas Aghadi News : वज्रमूठ सभा राजकारणाला नवी दिशा देणार, आघाडीच्या नेत्यांना विश्‍वास..

कडक बंदोबस्त..

नागपूर (Nagpur) महाविकास आघाडीच्यावतीने (Maavikas Aghadi) दर्शन कॉलनी मैदानात वज्रमूठ सभेत कुठलाही गोंधळ वा वाद होऊ नये, यासाठी पोलिसांकडून (Police) संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी तीन पोलिस उपायुक्तांसह शहरातील संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. त्यातूनच सभा स्थळापासून तर व्हीआयपींच्या मार्गावर चौफेर बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या सभेवरून भाजपचे (BJP) स्थानिक आमदार आणि माजी नगरसेवक यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने त्यातून कुठलाही वाद होऊ नये यासाठीच पोलिस खबरदारी घेत असून साडेसातशे पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्त पंधरा पोलिस निरीक्षकांसह दंगलविरोधी पथकासह बॉम्ब शोध व नाशक पथक आणि इतर सर्व पथके नेमण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com