Congress : रायपुरात कॉंग्रेसचे अधिवेशन सुरू, अन् प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात लागली गळती!

Nana Patole : नाना पटोले यांच्या कारभारामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचे दुःख व्यक्त केले.
Nana  Patole
Nana Patole Sarkarnama

Congress Nana Patole News : नाना पटोले हे कॉंग्रेसचे बहुधा सर्वाधिक चर्चेत राहिलेले प्रदेशाध्यक्ष असावे. नियुक्ती झाल्यापासून ते आजतागायत ते सतत वादात राहिलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्याची मागणी पक्षातील काही नेते करीत आहेत. आजपासून रायपूर येथे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे, अन् प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात कॉंग्रेसला गळती लागली आहे.

गोंदियात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून नाना पटोले काम करू देत नसल्याच्या आरोप करत गोंदिया जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षाने राजीनामा दिला आहे. २० वर्षांपासून आपण कॉंग्रेसशी जुळलेलो आहे, असे असतानासुद्धा आज नाना पटोले यांच्या कारभारामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचे दुःख या कार्याध्यक्षांनी व्यक्त केले.

मोरगाव अर्जुनीचे रहिवासी रत्नदीप दहीवले हे ते कार्याध्यक्ष आहेत. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून दुसऱ्या राजकीय पक्षांतून आलेल्या लोकांना कॉंग्रेसमध्ये मानसन्मान मिळतो. नाना पटोले आपल्या जवळच्या व्यक्तींचीच पक्षाच्या पदांवर नियुक्ती करतात आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला आणखी गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी याच कारणावरून आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या आदेशावरून नियुक्ती केल्यावर आम्ही जोमात काम केले. गोंदिया जिल्ह्यात पक्षाला वाढीस लावले. मात्र जेव्हापासून नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हापासून ते आम्हाला काम करू देत नसल्याचा आरोप दहीवले यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला काम न करू देण्याचे धोरण नाना पटोले यांचे असल्याने आज राजीनामा दिल्याचे दहीवले यांनी सांगितले आहे.

Nana  Patole
Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद जाणार की राहणार? काँग्रेसच्या नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

आम्हाला येथे काम करू न देण्यासाठी पटोलेंनी त्यांच्या खास माणसाला सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावान आणि वरिष्ठ मंडळीला सोडून त्यांनी बाहेरून आलेल्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष बनविले. यामुळे त्यांनी कॉंग्रेसच्या लोकांमध्ये दुफळी निर्माण केली. परिणामी गोंदिया जिल्ह्यात पक्ष रसातळाला गेला. त्यामुळे मी आणि माझ्यासारखे व्यतित झाले आहेत. गेल्या २० वर्षांपासून एनएसयुआय, युथ कॉंग्रेस त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा कार्याध्यक्ष या पदांवर काम केले आहे.

आमच्यासारख्या लोकांना अशी वागणूक मिळते, तर मग इतर लहान कार्यकर्त्यांबद्दल तर विचारायलाच नको. नाना पटोलेंनी (Nana Patole) त्यांच्या निवडक लोकांना हाताशी धरून आमच्यासारख्या जुन्या लोकांना दाबण्याचे काम सुरू केले आहे. अशी मुस्कटदाबी होत असताना काॅंग्रेस पक्षात (Congress) राहण्याला काही अर्थ नाही. म्हणून नाइलाजाने आज हा निर्णय घेतला आहे. गोंदिया (Gondia) नाना पटोलेंचा गृह जिल्हा आहे. त्यांच्याच गृहजिल्ह्यात कार्यकर्त्यांची ही अवस्था पक्षासाठी घातक असल्याचेही दहिवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in