
नागपूर : ईडीच्या माध्यमातून मोदी सरकार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना मानसिक त्रास देत असल्याने काँग्रेसच्यावतीने आज पुन्हा ईडी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे युवक काँग्रेसने अर्धनग्न आंदोलन करून कारवाईचा निषेध केला.
काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ईडीच्या (ED) माध्यमातून सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले जात आहे. त्यांची तब्येत आणि वयाचासुद्धा विचार केला जात नाही. एकाच प्रकरणासाठी वारंवार चौकशीसाठी का बोलावले जात आहे, याचे उत्तर मात्र ईडीतर्फे आजवर देण्यात आले नाही. सरळसरळ ईडी मोदी सरकारच्या (Modi Government) इशाऱ्यावर काम करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. फक्त काँग्रेस आणि विरोधकांनाच ईडी त्रास देत आहे. भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांवर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी त्यांची साधी चौकशी केली जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात ईडी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईडी कार्यालयात घुसण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. आंदोलनात माजी मंत्री सावनेरचे आमदार सुनील केदार, आमदार ॲड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, प्रा.दिनेश बानाबाकोडे, शेख हुसेन, नंदा पराते, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, गिरीश पांडव, नैश अली, रामगोविंद खोब्रागडे, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, मिलिंद दुपारे, वासुदेव ढोके, महेश श्रीवास, अरुण डवरे, आशिष दीक्षित, रमण पैगवार, केतन ठाकरे, विना बेलगे, सुहास नानवटकर, सरफराज खान, राजेश पौनीकर, ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, मोतीराम मोहाडीकर, प्रवीण गवरे, सुजाता कोंबाडे, स्नेहल दहीकर, गीता जळगावकर, मंदा वैरागडे, अर्चना बडोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
युकाँचे काळे फुगे घेऊन आंदोलन..
मंगळवारी कार जाळल्यानंतर आज युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत डोक्याला काळ्या फिती बांधून व हातात काळे फुगे घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्र प्रभारी प्रदीप सिंधव, प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचा कुणाल राऊत यांनी निषेध नोंदविला. आंदोलनात तनवीर विद्रोही, श्रीनिवास नालमवार, आकाश गुजर, अजित सिंग, रौनक चौधरी,अक्षय हेटे, अनिरुद्ध पांडे, सहदेव गोसावी, निलेश खोब्रागडे, मोहमद इर्शाद, रौनक नांदगावे, सय्यद फरमान, सुशांत लोखंडे, राहुल खैरकार, इरशाद शेख, इरफान काजी, राजेश निमगाडे आदी सहभागी झाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.