
Nagpur Congress Political News : कॉंग्रेस नेत्यांच्या एकीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविभवन येथे बैठक घेऊन संवाद यात्रेचे नियोजन केले होते. त्यावेळी सर्व नेत्यांनी हातात हात घेऊन ‘हम सब एक है’, चा संदेश दिला होता. यावर कार्यकर्त्यांनी शंकाही व्यक्त केली होती. अखेर ती शंका खरी ठरली आणि ती बैठक फोटोपुरातीच मर्यादित ठरली. (And that meeting was limited to photos)
संवाद यात्रेवरून उत्तर नागपुरात विसंवाद दिसून येत आहे. त्यामुळे सर्व कॉंग्रेस नेत्यांना एक करण्यात नाना पटोलेंना अपयश आल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या संवाद यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला असताना उत्तर नागपूरने मात्र नियोजित तारखेच्या आधीच आपली यात्रा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यात्रा सुरू व्हायच्या आधीच शहरात गटबाजी उफाळून आल्याचे दिसून येते.
संवाद यात्रेचे मुख्य संयोजक, आमदार विकास ठाकरे यांनी तारीख, वेळ आणि विधानसभनिहाय यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रविवारी (ता. ३) दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील राजाबाक्षा मंदिरापासून या यात्रेचा श्रीगणेशा होणार आहे. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाची यात्रा ११ व १२ सप्टेंबरला निघणार आहे. मात्र उत्तर नागपूरचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी रविवारीच (ता.३) यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे.
या पदयात्रेत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव संजय दुबे, शहर उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, हरिभाऊ किरपाने, ठाकूर जग्यासी, रवी कोट्याल, मंसूर खान, खुशाल हेडाऊ, बेबी गौरीकर, कल्पना द्रोणकर, विजया हजारे, ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील, मुलचंद मेहर, दीपक खोब्रागडे, मुन्ना पटेल, अनिरुध्द पांडे, नीलेश खोब्रागडे आदी सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे यात्रेची तयारी आणि कार्यक्रमाच्या आखणीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रविभवन येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार नितीन राऊत, (Nitin Raut) आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक आदी सर्व उपस्थित होते. सर्वांनी हातात हात घालून आम्ही एकत्र असल्याचा संदेश दिला होता. आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत असेही फोटो काढून दर्शवले होते. मात्र एकीकरणाची ही बैठक फक्त फोटोपुरातीच मर्यादित ठरली.
समन्वयकांवरून मतभेद..
संवाद यात्रेचे मुख्य समन्वयक विकास ठाकरे आहेत. याशिवाय विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्तर नागपूरचे समन्वयक म्हणून विवेक निकोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हीच बाब नितीन राऊत यांच्या गटाला खटकली. निकोसे हे विकास ठाकरे यांचे समर्थक आहेत.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.