Congress : कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश, 'ते' नेते आमदारांचे मित्र !

चंद्रपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, (Chandrashekhar Bawankule) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाची चर्चा रंगली असून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Chandrashekhar Bawankule at Chandrapur
Chandrashekhar Bawankule at ChandrapurSarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) ः आमदार सुभाष धोटे यांचे अतिशय जवळचे मित्र, गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी यांनी भाजपत प्रवेश घेतलाय. चंद्रपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, (Chandrashekhar Bawankule) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

राज्यात (Maharashtra) काँग्रेसचा (Congress) मोठा गट भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या चर्चा सूरू आहेत. मात्र आता राजुरा विधानसभेतील कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा भाजपप्रवेश काँग्रेसच्या विशेषतः आमदार सुभाष धोटे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सातत्याने या क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार निवडून यायचे. पण ॲड. वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या विजयी परंपरेला प्रथमतः खिंडार पाडले. यानंतर ॲड. संजय धोटे यांच्या विजयाने भाजपची या विधानसभा क्षेत्रात एन्ट्री झाली. सद्यःस्थितीत काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे हे दुसऱ्यांदा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.

काँग्रेसच्या ताब्यात असलेला राजुरा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे ॲ.ड संजय धोटे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांनी आमदार सुभाष धोटे यांचे अतिशय जवळचे मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी यांच्या चिरजिवांना भाजपमध्ये घेऊन त्यांना मात देत केलेली खेळी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. राहुल चौधरी जरी भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे वडील सुरेश चौधरी हे मात्र काँग्रेसमध्येच आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील विजयी उमेदवार गोंडपिपरी तालुका ठरवितो. अशा वेळी राजुऱ्याच्या नेत्यांचे या तालुक्याच्या राजकारणाकडे विशेष लक्ष असते.

Chandrashekhar Bawankule at Chandrapur
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

यामुळेच राजुऱ्याच्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या गोंडपिपरीच्या वाऱ्या वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत आपला डंका वाजविण्यासाठी तयारी सूरू झाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरी आपली जागा निर्माण करून भाजपने खेळलेली खेळी कितपत कामात येईल हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.

राहुल चौधरीसारखे युवा नेतृत्व भाजपत आल्याने आम्हाला त्याचा फायदा होईल. येणाऱ्या दिवसांत काँग्रेससह इतर पक्षांतील कार्यकर्तेसुद्धा भाजपमध्ये येणार आहेत.

- चेतनसिंह गौर

शहर अध्यक्ष, भाजप.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in