Congress news| कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

Chandrapur Politics| ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा काही एक फायदा होणार नाही.
Congress news|
Congress news|

चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांचे सुपुत्र राहुल चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आपल्या अंत्यत निकटच्या मित्राच्याच मुलाने काँग्रेसची (Congress) साथ सोडल्याने आमदार सुभाष धोटे यांना हा विषय जिव्हारी लागला होता.

गोंडपिपरी तालुका काँग्रेसने याविषयावर राहुल चौधरींच्या भाजप प्रवेशाच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल चौधरी यांचा कुठलाच राजकीय पिंड नाही. ते केवळ व्यावसायिक आहेत. त्यांनी कधीच काँग्रेस वा इतर पक्षाचे काम केले नाही. जो मुळात राजकारणीच नाही. तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याचा त्या पक्षाला काय फायदा होणार असा प्रश्न विचारित काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Congress news|
..तर 'त्या' आमदारांची नियुक्ती निवडणुकीनंतर करा...

सुरेश चौधरी यांच्या व्यावासायिक मुलाला भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजप कार्यकर्ते मोठे समाधानी असतील व काँग्रेसला खिंडार पडल्याचे सांगत असतील तर ते निवळ हास्यास्पद असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत. सुरेश चौधरी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं काँग्रेसच्या वाढीसाठी योगदान राहिलं आहे. आजही ते काँग्रेसमध्ये असून पक्षाच काम सक्रियपणे पार पाडीत आहेत. राहुल चौधरीला राजकारणात ना रस आहे.ना त्यांनी कधी सक्रियपणे काम केलं आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा काही एक फायदा होणार नाही.

आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजूरा विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे.अनेक पक्षातील कार्यकर्ते काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहेत.व्यावसायीक राहूल चौधरीच्या भाजप प्रवेशाने आम्हाला कूठलच नुकसान होणार नाही, असे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com