Congress News: पटोलेंना एकाकी पाडण्यासाठी विदर्भातील नेते सरसावले, पण ‘यामुळे’ नानांची बाजू भक्कम !

Nana Patole : पटोलेंचा विरोध पेल्यातले वादळ ठरणार की काय, असे वाटू लागले आहे.
Sunil Kedar, Nana Patole and Vijay Wadettiwar
Sunil Kedar, Nana Patole and Vijay WadettiwarSarkarnama

Vidarbha News : नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौन तोडत पटोलेंसोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत उघड उघड संघर्ष सुरू केला. त्यांच्यापाठोपाठ विदर्भातील काही नेत्यांनीही नाना पटोलेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

कॉंग्रेसमधील काही नेते नाना पटोलेंना एकाकी पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. पण त्यानंतरही नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या भूमिकेपासून तसूभरही हललेले नाहीत आणि आपले काम नेटाने करीत आहेत. पोटनिवडणुकांमध्येही शिक्षक आणि पदवीधरप्रमाणे यश मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात. पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी होऊनही यामध्ये अद्याप कुणी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे पटोलेंचा विरोध पेल्यातले वादळ ठरणार की काय, असे वाटू लागले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष झालेल्या नानांनी राज्य पिंजून काढले आणि सुस्त पडलेल्या कॉंग्रेसमध्ये जान फुंकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने चांगले यश मिळवले. दोन वर्षांपूर्वी नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा आत्ता झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका कॉंग्रेसने अमरावती आणि नागपूरमध्ये भाजपच्या बलाढ्य उमेदवारांना धूळ चारली.

कॉंग्रेसमध्ये हे बदल नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बघायला मिळाले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कुठेतरी याचा विचार करतील, अशी अपेक्षा पटोलेंच्या समर्थकांना आहे. नाना आपली बाजू भक्कमपणे मांडण्यात कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांचे समर्थक सांगतात.

Sunil Kedar, Nana Patole and Vijay Wadettiwar
Aditya Thackeray News : मनात सत्तेची खुर्ची असणाऱ्यांच्या नशिबी आता रिकाम्या खुर्च्या ; मुख्यमंत्र्यांना टोला..

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत. त्यामुळे विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांची त्यांना भक्कम साथ मिळायला पाहिजे, असे वाटत होते. पण विदर्भातूनच त्यांना विरोध वाढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा कुणाला द्यायचा, यावरून घोळ सुरू होता. अशा परिस्थितीत माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री आमदार विजय विजय वडेट्टीवार यांनी सुधाकर अडबाले यांना पाठिंबा घोषित करून टाकला. त्यानंतर कुणी पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा करीत असेल, तर ती पक्षाची भूमिका नाही, अशा आशयाचे वक्तव्य पटोलेंनी केले होते.

Sunil Kedar, Nana Patole and Vijay Wadettiwar
काँग्रेस वंचित आघाडीबाबत, नाना पटोले म्हणाले…

तेव्हाच पटोले (Nana Patole) आणि केदार, (Sunil Kedar) यांच्यामध्ये जमेनासे झाले आहे, हे उघड झाले होते. त्यांनी पाठिंबा दिलेले अडबाले विजयी झाले. एकुणच हे कॉंग्रेसचे (Congress) यश आहे. पण मग नेत्यांमध्ये एकवाक्यता का नाही, हा प्रश्‍न तेव्हाही चर्चिला गेला. काल तर सुनील केदार यांनी उघड उघड बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असल्याचे सांगून थेट नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पटोले विरोधाला धार आली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक आव्हाने पेललेले नाना पटोले, आता कसा सामना करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कॉंग्रेसचे नेते एकसंघ राहिले तर कुणीही कॉंग्रेसचा पराभव करू शकत नाही, हे बरेचदा सिद्ध झालेले आहे. कॉंग्रेसला कुणी हरवू शकत असेल, तर ती फक्त कॉंग्रेस, असे नेहमीच बोलले जाते. तरीही कॉंग्रेसचे नेते एकत्र का राहात नाहीत, हा मोठा प्रश्‍न सामान्य कार्यकर्त्यांना पडतो. किमान आता बलाढ्य भाजपच्या विरोधात लढताना तरी नेत्यांनी एकसंघ राहावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com