भाजप नगरसेवक सहलीवर; छोटू भोयरांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

नागपूर, अकोला, वाशिम आणि बुलढाण्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली आहे.
छोटू भोयर
छोटू भोयर

नागपूर : राज्यातील विधानपरिषद निवडणुका (Maharashtra Vidhan Parishad Election) तोंडावर आल्या आहे. नागपूर, अकोला, वाशिम आणि बुलढाण्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्येही निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्याला उमेदवारी दिल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. मतदान किंवा उमेदवार फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली. तर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीमुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

छोटू भोयर
गुलाब नबी आझाद धमाका करणार : काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत

गेल्याच आठवड्यात छोटू भोयर यांनी भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता भाजपनेही सावध भूमिका घेतली आहे. मतदान फुटू नये यासाठी भाजपने नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे. छोटू भोयर यांनी सहली विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

भाजपने आपले उमेदवार फुटू नये किंवा काही दगाफटका होऊ नये म्हणून नगरसेवकांना सहलीला पाठवले असल्याचे छोटू भोयर यांनी म्हटले आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेत आता फक्त भाजपचे 156 पैकी 105 नगरसेवक आणि नगरसेवकांच्या अनुपस्थितीत भाजपचे पदाधिकारी प्रति नगरसेवक म्हणून काम कार्यरत आहे.

छोटू भोयर यांनी1987 पासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम सुरू केलं. गेल्या 34 वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रीय होते. ते भाजपचे 20 वर्षे ते नगरसेवक होते. नागपूरचे उपमहापौर पद आणि नागपूर महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com