Devendra Fadanvis : कॉंग्रेस हे बुडते जहाज, त्यामुळे त्यांचे लोक सोडून चाललेत…

नियमांच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही,असे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहीत नाही, ते दसरा मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार का हेही मला माहीत नाही, गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो मात्र जे नियमात आहे ते होईल, नियमांच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही,असे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज नागपुरात (Nagpur) आले असता विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Gulam nabi Azad) यांच्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, काँग्रेस (Congress) पक्षाची स्थिती बुडत्या जहाजासारखी आहे आणि ज्या लोकांना हे माहिती पडलं आहे की, या जहाजाला आता वाचवता येणार नाही. त्यामुळं असे लोक पक्ष सोडत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत, जे की योग्य आहेत. शेवटी हा त्यांचा निर्णय आहे आणि कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यावर आता मी जास्त बोलणं योग्य नाही.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने नुकतीच युती केली आहे. संभाजी ब्रिगेड ही शिवसेनेसारखीच लढवय्यी संघटना आहे. या युतीमुळे आमची ताकद वाढली आहे, असे वक्तव्य शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले आहे. या युतीबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, विनाश काले विपरीत बुद्धी. आता करायला काहीच नसल्यामुळे काहीतरी केल्यासारखे दाखवण्याचा हा प्रकार आहे.

Devendra Fadanvis
Bullet Train: फडणवीस म्हणाले, `बुलेट ट्रेन रद्द करणार नाहीच`

विधान परिषदेत पैशाचा गैरव्यवहार झाला, याबाबत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले. त्याबाबत विचारले असता, ते काय बोलले, याची मला कल्पना नाही. माहिती घेतल्याशिवाय बोलणे योग्य होणार नाही. त्यामुळे या विषयात माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडणार आहे अशी चर्चा आहे, पण याबाबत मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in