Congress : विदर्भात जिल्हे अकरा; पक्षाचे वाजले बारा

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या गोंदिया जिल्ह्यातही सर्वकाही अलबेल नाही. उपराजधानी नागपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांचे तोंड दोन वेगवेगळ्या दिशेला आहे. (Vidharbh Congress)
Congress In Vidharbh News
Congress In Vidharbh NewsSarkarnama

नांदेड : काँग्रेसला उभारी आणि भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला समाजवादी विचारांचा पर्याय देण्यासाठी राहुल गांधी यांनी `भारत जोडो` यात्रा सुरू केली. यातून काय साध्य व्हायचे ते होईलही. पण, आज मराठवाडा आणि विदर्भातील १९ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांत गटबाजीमुळे काँग्रेसच काँग्रेसचा मोठा विरोधक आहे. जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणीही गटबाजीची पाळेमुळे घट्ट आहेत. त्याचाच फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळे भारत जोडोसह `काँग्रेस जोडो` याचा अधिक विचार राहुल यांना करावा लागणार आहे.

Congress In Vidharbh News
Marathwada : `भारत जोडो`सोबतच काँग्रेस जोडो देखील व्हायला हवे..

अमरावती जिल्हा वगळता इतर दहा जिल्ह्यांत गोंदियातील आमगाव ते बुलडाण्यातील खामगावपर्यंत गट, कार्यकर्ते, नेते यांच्यात इगो-मतभेद आहेत. (Congress) वाशीम जिल्ह्यात ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख पक्षात नसले तरीही त्यांचे कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणीत आहेत. त्यामुळे त्यांचा गट आहे. (Vidharbh) देशमुख गटाचे आमदार अमित झनक गटाशी राजकीय वैर आहे. यातून पक्ष संघटन वाढीस नाही.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या गोंदिया जिल्ह्यातही सर्वकाही अलबेल नाही. उपराजधानी नागपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांचे तोंड दोन वेगवेगळ्या दिशेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच एकमेकांचे विरोधक आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर तीन गट सक्रिय आहेत.

भंडाऱ्यातही मोठी गटबाजी आहे. बुलडाणा म्हटले ओठांवर नाव येते ते ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे. मात्र, वासनिक यांच्या कर्मभूमीत काँग्रेसमध्ये गट-तट आहेत. सात मतदारसंघांमध्ये दोन आमदारांची संख्या एकावर आली. वासनिक आतापर्यंत जिल्ह्यापासून दूर होते. पण, `भारत जोडो` निमित्त दोन‌ महिन्यांपासून ते बुलडाणा वाऱ्या करीत आहेत.

अकोला हा माजी मंत्री दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांचा जिल्हा. मात्र, आता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ भाजपचेही वजन वाढले आहे. अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाहीत. नव्या-जुन्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com