कॉंग्रेसमधील असंतुष्टांचा नाना पटोलेंवर निशाणा; असंतुष्ट दिल्लीत धडकणार !

प्रदेश काँग्रेस (Congess) कमिटीच्या प्रतिनिधींच्या यादीतून माजी पालकमंत्री नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना वगळण्यात आले.
Nana Patole Congress
Nana Patole CongressSarkarnama

नागपूर : प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींच्या यादीतून माजी पालकमंत्री नितीन राऊत (Dr. Nitin Raut) आणि सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांना वगळण्यात आल्याने शहरात मोठा असंतोष उफाळून आला आहे. असंतुष्टांनी लगेच बैठक घेऊन दिल्लीत (Delhi) न्याय मागण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेश प्रतिनिधींमध्ये प्रदेश सरचिटणीस तानाजी वनवे, संजय दुबे, नरेंद्र जिचकार, आर.एम. खान नायडू, हैदर अली दोसानी, सेवादलाचे कृष्णकुमार पांडे यांच्यासह सेवादल व महिला काँग्रेस (Congress) कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही यादी अद्याप अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र ती खरी असल्याचे असंतुष्टाचे म्हणणे आहे.

काही पदाधिकारी मुद्दामच लपवाछपवी करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही यादी उघड होताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला. सोमवारी माजी आमदार एस. क्यू. जमा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बूथ ते शहर स्तरावर कुठल्याही निवडणुकीशिवाय प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हा प्रकार लोकशाहीविरोधी तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आशीर्वादाने नागपूर शहरातून काँग्रेस संपवण्याचे षड्यंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप यावेळी असंतुष्टांनी केला. त्यामुळे तत्काळ एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीत जाऊन प्रमुख निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री तसेच इतर बड्या नेत्यांना भेटणार आहेत. बैठकीला तानाजी वनवे, जिया पटेल, संजय दुबे, शकूर नागानी, कमलेश समर्थ, खान नायडू, के.के. पांडे, हुकूमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, वसंत गाडगे, किशोर जिचकार, संजय कडू, विलास भालेकर आदी उपस्थित होते.

Nana Patole Congress
नाना पटोले म्हणाले, महाशक्ती कुणाची हे आम्हाला कळाले

असे आहेत प्रदेश प्रतिनिधी..

प्रदेश प्रतिनिधी म्हणून विलास मुत्तेमवार, अविनाश पांडे, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, अनीस अहमद, रामकिशन ओझा, पुरुषोत्तम हजारे, गिरीश पांडव, बंटी शेळके, प्रफुल्ल गुडधे, राजकुमार कमनानी, प्रशांत धवड, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, दीपक काटोले यांच्या नावाचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in