Congressने शब्द पाळला नाही; झाडेंचे प्रयत्न फसले, अडबालेंचा दबावही निष्प्रभ...

Nagpur : झाडे यांनी सर्व काँग्रेस नेत्यांच्या भेटीसुद्धा घेतल्या. मात्र, कोणीच प्रतिसाद दिला नाही.
Sudhakar Adbale and Rajendra Zade.
Sudhakar Adbale and Rajendra Zade.Sarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे किंवा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्यापैकी एकाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समर्थन जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. झाडे यांनी सर्व काँग्रेस नेत्यांच्या भेटीसुद्धा घेतल्या. मात्र, कोणीच प्रतिसाद दिला नाही.

अडबाले यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकावर राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांचा पाठिंबा असल्याचे आधीच जाहीर करून काँग्रेसवर (Congress) दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. भाजपने (BJP) गाणार यांना समर्थन जाहीर केले तर औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघाकरिता किरण पाटील यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले.

एकाच वेळी, एकाच राज्यात आणि शिक्षक आमदार विधान परिषदेची निवडणूक होत असताना एकाला समर्थन तर दुसऱ्याला पक्षातर्फे उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांना अखेर भाजपने अधिकृत समर्थन जाहीर केले तर गंगाधर नाकाडे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे.

नाकाडे यांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला असून, नागोराव गाणारांनी आज दावेदारी दाखल केली. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे यांनी यापूर्वीच उमेदवारी दाखल केली. गाणार यांना उमेदवारी द्यायची की नाही, यावरून भाजपमध्ये बऱ्याच दिवसांपासून खल सुरू होता. एक गट त्यांच्या विरोधात होता. मागील आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीची बैठक घेऊन नागपूर विभागातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत विचारणा केली होती. त्यानंतरही पाठिंबा जाहीर करण्यात आला नव्हता.

Sudhakar Adbale and Rajendra Zade.
Kunal Patil News; धुळ्याच्या प्रश्नांवर नागपूर अधिवेशनात घडवली चर्चा

गाणारांच्या उमेदवारीबाबत शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, असे सांगून सस्पेंस वाढवला होता. आज अखेर भाजपच्या केंद्रीय कार्यालयातूनच गाणार यांच्या पाठिंब्याचे पत्र धडकल्याने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला जाईल, असे मंगळवारी सांगितले होते. त्यापूर्वीच शिवसेनेच्यावतीने गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in