Congress : महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकते! काँग्रेसच्या 'या' नेत्यानं वाढवलं आघाडीचं टेन्शन

Congress Political News : तिथे आपले आमदार वाढणार....
Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.Sarkarnama

Congress Political News : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेनंतर काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर तर झालीच शिवाय काँग्रेस नेतेही अँक्शन मोड मध्ये आले आहे. एकप्रकारे गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेसमध्ये नवचैतन्य आलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्याकडून सातत्यानं स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिका मांडली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकते असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार झाली. त्यांनी हा दावा केला आहे.

नाना पटोले म्हणाले, सध्याचे वातावरण पाहता काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकते, अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. ज्या कोकणात आपला एकही आमदार नाही, तिथे आपले आमदार निवडून येतील अशी स्थिती आहे. सोलापूर, नाशिक अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आमदारांची संख्या नगण्य असली तरी तिथे आपले आमदार वाढणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ताकदवान नेतेमंडळी काँग्रेसमध्ये आहे. पण ते लोक खोकेवाले नाहीत आणि धोकेवालेही नाहीत अशा शब्दांत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी मुंबईच्या जवळपासचे परिसर आपल्यासाठी फार महत्वाचं म्हटलं असून ठाणे, पालघर, नवी मुंबई या जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे असंही पटोले म्हणाले आहेत.

Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
Mahrashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला आयात करावा लागला उमेदवार; आघाडीचे तगडे आव्हान

..तेच पवार काँग्रेसच्या आता कार्यालयात आले!

जे काँग्रेसला संपवायला निघाले होते, सतत कुरघोड्या करत होते. आणि काँग्रेस संपली तर आपण जिवंत राहू अशी आशा बाळगून होते. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर तेच लोकं आता काँग्रेस संपू शकत नाही असे म्हणू लागले आहेत. ही आपल्यासाठी संधी आहे.

जे शरद पवार हे 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते तेच काँग्रेसच्या स्थापना दिवसाला कॉंग्रेसच्या पुणे येथील कार्यालयात आले होते. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे भारत जोडो यात्रेनंतर तेच लोकं काँग्रेस संपू शकत नाही असे बोलू लागले आहेत असा टोला लगावतानाच त्यांचा टीकेचा रोख नेमका कुणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
Congress News : काँग्रेसकडून पटोलेंना नाराळ देण्याची तयारी? ठाकूर, केदार अन् थोपटेंपैकी कुणाला लागणार लॉटरी

...अन् काँग्रेसचा स्वबळाचा नारा पुन्हा चर्चेत

आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बुधवारी (दि. 11) मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुका महाविकास आघाडीसह की स्वबळावर लढायच्या यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, आता या बैठकी आधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या सहभागाविषयीचा संस्पेन्स वाढला आहे. जर काँग्रेसनं स्वबळाचता नारा दिला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट हे युतीबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com