
Vidarbha : पश्चिम विदर्भातील महत्वाचा लोकसभा मतदार संघ असलेल्या अकोल्यावर काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात थेट दावा करणारे विधान केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसकडे राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल असे विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
राज्यात काँग्रेस(Congress), शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट यांच्यात महाविकास आघाडी कायम आहे. अशात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
अकोला लोकसभा मतदार संघावर आमचाच (काँग्रेस) दावा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाने अकोला लोकसभा मतदारसंघ त्यांना मिळावा याबाबत मागणी केली असली, तरी या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा असण्याचे कोणतेही कारण नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे समीकरण अगदी स्पष्ट आहे. ठरल्याप्रमाणचे लोकसभा व विधानसभेच्या जागांचे वाटप व्हायला पाहिजे असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. अशात ठाकरे गटाने(Thackeray Group) अकोला लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यास यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले. मात्र, आम्ही (काँग्रेस) अकोला लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोतच असे ते म्हणाले.
विधानसभांच्या जागा वाटपावरून अकोल्यात तिढा निर्माण होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) सोबत आल्यास ते अकोल्यातील विधानसभा मतदारसंघावर दावा करू शकतात. त्यापैकी एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ‘वंचित’ला घेऊन अकोल्यातील ठाकरे गटाचे ‘वेट अॅन्ड वॉच’ सुरू आहे. याबाबत मात्र वडेट्टीवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.