Congress : कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष येणार अडचणीत, शहराध्यक्ष आमदार ठाकरेंनी केली ‘ही’ सक्ती...

Congress Workers : पक्षात आपले वजन राखण्यासाठी अनेक कार्यकर्ते मोठमोठी पदे घेतात.
Vikas Thakre
Vikas ThakreSarkarnama

Nagpur Municipal Corporation Election : नागपूर (Nagpur) शहर कॉंग्रेसमध्ये ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण हे अध्यक्ष काम करीत नाहीत, तर केवळ देखावा करतात. त्यामुळे पक्ष रसातळाला चालला आहे. आता पक्षाचे अधिक नुकसान होऊ नये, म्हणून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी युक्ती शोधून काढली आहे. त्यामुळे बिनकामाचे ब्लॉक अध्यक्ष आता आपोआपच ‘ब्लॉक’ होणार आहेत.

पद घेऊन काँग्रेसच्या (Congress) ब्लॉक अध्यक्षांना आता घरी बसता येणार नाही. त्यांनी खरोखरच कार्यकारिणी केली किंवा नाही याकरिता काँग्रेसने शक्कल लढवली आहे. यापुढे प्रत्येक बैठकीला येताना ब्लॉक अध्यक्षांना कार्यकारिणीला सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी बैठकीला येताना संपूर्ण कार्यकारिणी सोबत आणण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे कागदोपत्री कार्यकारिणी तयार करून देखावा करणारे ब्लॉक अध्यक्ष अडचणीत येणार आहेत.

पक्षात आपले वजन राखण्यासाठी अनेक कार्यकर्ते मोठमोठी पदे घेतात. मात्र सोबत एकही कार्यकर्ता नसतो. कागदोपत्री कार्यकारिणी दाखविली जाते. प्रत्यक्षात त्यातील काही सदस्यांनाही आपल्याला कार्यकारिणीत घेण्यात आले याचीसुद्धा माहिती नसते. अनेक महाभाग आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे त्यात घालतात. ही बाब निदर्शनास आल्याने आमदार विकास ठाकरे यांनी बैठकीला येता ब्लॉक अध्यक्षांना कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना सोबत घेऊन येण्याचे निर्देश दिले आहे.

देवडिया भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले. तत्पूर्वी हिमाचल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या विजयाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. आता नागपूर महापालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचे असल्याने ठाकरे यांनी पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्षांना प्रभाग व वार्डातील जनतेला काँग्रेसची भूमिका जनतेला समजावून सांगण्याचे आवाहन केले. सोबतच जनतेच्या समस्या जाणून घ्या, त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करा, अशाही सूचना केल्या.

Vikas Thakre
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

भाजपची हवा खराब..

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता हिसकावून आणली. मोदी-शहा यांच्यासारखे भाजपचे नेते संपूर्ण ताकदीने प्रचारात उतरले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे वातावरण तयार होत आहे. आता आपल्याला महानगर पालिका जिंकायची आहे. महाराष्ट्रात भाजपची हवा खराब आहे. त्याचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकाने सक्रिय व्हावे, असे आवाहन यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com