Congress : अदानी ग्रुपची ही सर्वात मोठी पडझड, हिडेनबर्ग रिपोर्टची चौकशी करा !

Adani : एकूण बाजारातील पत फक्त ९.५० लाख कोटी इतकीच राहिलेली आहे.
Congress, Akola.
Congress, Akola.Sarkarnama

Adani Group News : अदानी ग्रुपची पडझड सुरू झाल्यानंतर देशाच्या शेअर मार्केटमधील इतिहासातील ही सर्वात मोठी पडझड आहे. अदानी केवळ राजकीय वरदहस्तामुळेच आज हा घोळ करू शकले. त्यामुळे हिडेनबर्ग प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली.

यासंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेस नेते म्हणाले, अदानी ग्रुप संदर्भात अमेरिकेतील हिडेनबर्ग रिसर्च या संस्थेने २५ जानेवारी रोजी अहवाल सादर केला. अहवाल प्रकाशित झाल्यानंतर १९ लाख ५० हजार कोटी इतके प्रचंड बाजारमूल्य असलेल्या अदानी ग्रुपची पडझड सुरू झाली. त्याची एकूण बाजारातील पत फक्त ९.५० लाख कोटी इतकीच राहिलेली आहे.

अदानी ग्रुपमध्ये भारत सरकारच्या ताब्यातील एलआयसी, एसबीआय व इतर वित्त संस्थांनी मोठी गुंतवणूक केली होती. म्हणूनच अदानीची पडझड म्हणजे सामान्य माणसाच्या कष्टाने कमाविलेल्या पैशांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही पडझड ९.५० लाख कोटीपर्यंत येऊन थांबली. याचे मुख्य कारण म्हणजे आता राहिलेले ९ लाख ५० कोटी हे फक्त सरकारने गुंतवणूक केलेले पैसे आहेत. भारतातील (India) सरकार वित्तीय संस्थानी अदानी ग्रुपला एकूण २ लाख १८ हजार कोटी रुपये कर्जस्वरूपात दिलेले आहेत.

या कर्जाच्या बदल्यात अदानीने त्यांच्या विविध कंपन्यांतील शेअर्स गहाण ठेवलेले आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. मागील काही वर्षांमध्ये अदानी ग्रुपने गौतम अदानी यांच्या नेतृत्वात ५८ कंपन्या विविध देशांमध्ये निर्माण केल्या व त्यामाध्यमातून हा सर्व खेळ उभा केला. अदानी ग्रुपचे अंकेक्षण करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेचे नाव शाह धंधारिया या संस्थेने केलेले आहे. या संस्थेला वित्तीय क्षेत्रातील मोठ्या कामांचे अंकेक्षण करण्याचा अनुभव नसताना कंपनीला अंकेक्षण करण्याची संधी कशी मिळाली, असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला.

Congress, Akola.
Congress : अशोक चव्हाणांनी फडणवीसांच्या जवळच्या नेत्याला दिली ‘ही’ ऑफर !

हिडेनबर्ग संशोधन अहवालात जे ८८ प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्याला योग्य व समर्पक उत्तर देणे गरजेचे असताना गौतम अदानी (Goutam Adani) यांनी भारताचा झेंडा पाठीमागे लावून राष्ट्रवादाची भूमिका घेऊन कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. अदानी यांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) पाठबळ असल्यामुळे त्याची आर्थिक भरभराट झाली, असा आरोपसुद्धा यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे (Congress) प्रशांत गावंडे, प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष प्रशांत वानखडे पाटील, माजी नगरसेवक साजिद खान पठाण, महेंद्र गवई आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com