Poharadevi : पोलिसांचा बंदोबस्त कमी पडल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ; नेमकं काय घडलं?

Washim District News : मंत्री संजय राठोड यांच्या पत्नींनी स्वत: गर्दीत शिरुन लोकांना शांत बसण्याचे आवाहन केले
Washim District News
Washim District News Sarkarnama

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज वाशिम दौऱ्यावर होते. यावेळी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र, या ठिकाणी एवंढी गर्दी झाली होती की गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील कमी पडत होता.

Washim District News
Maharashtra Congress : पटोले - थोरात वादावर पडदा पडणार का ? ; "आज मुंबईत.."

या कार्यक्रमसाठी सभामंडपात बसलेल्या काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र, हे लक्षात येताच मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पत्नींनी स्वत: गर्दीत शिरुन लोकांना शांत बसण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी कार्यक्रमातील सभामंडपात फिरुन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.

सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत होत असतानाच काहीजण कार्यक्रमातून उठून जात होते. त्यामुळे उठून जात असणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. तसेच सभास्थळी बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे काहीसा गोंधळ पाहायला मिळाला.

Washim District News
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला म्हणतात...'हे नौटंकी आंदोलन'

या कार्यक्रमावेळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत होता. तसेच यावेळी आयोजकांनी विनंती करुन देखील लोक ऐकायला तयार नव्हते. तसेच सभेला उशीर झाल्यामुळे काही लोक सभामंडपातून उठून जातानाही दिसून आले. त्यामुळे काहीसा तणाव येथे पाहायला मिळाला.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे वाशिम दौऱ्यावर होते. तसेच पोहरादेवी येथे कार्यक्रमाला येणार हे पोलिसांना माहित असूनही पोलिसांचे नियोजन कमी कसे पडले? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in