वडेट्टीवारांना आत्मविश्‍वास, आजचा निकाल ओबीसींच्याच बाजूने लागणार…

आज त्यांचे (BJP) सरकार असलेल्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) टाच येताच त्यांना जाग आली, अशी जबरी टिका वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

भंडारा : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. मी ओबीसी कल्याण मंत्री जरी असलो, तरी आरक्षण राखण्यासाठी ओबीसी कार्यकर्ता म्हणून काम करत आहो. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या बाजुनेच निकाल लागणार, असा आत्मविश्‍वास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला.

काल रविवारी गोंदिया येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार आणि आयोगात कोणतेही मतभेद नाहीत. सर्व कामे सुरळीत सुरू आहेत. यावेळी इम्पिरिकल डेटा जमा करण्यासाठी 5 महिने लागणार आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार न्यायालयाला वेळ वाढवून मागत आहोत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न हा केवळ महाराष्ट्रापुरता नसून तो संपूर्ण देशासाठी आहे, हे आम्ही वारंवार सांगत आलो. पण केंद्र सरकार वारंवार महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात उभा ठाकत आली आहे. त्याचे परिणाम ओबीसी समाजाला भोगावे लागत आहे. आज त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणावर टाच येताच त्यांना जाग आली, अशी जबरी टिका वडेट्टीवार यांनी केली.

इतर राज्यात ठेच बसल्यावर आली केंद्राला जाग..

केंद्र सरकारने आता नव्याने प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. यामध्ये ओबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या असे केंद्राने म्हटले आहे. आम्ही यापूर्वी याचिका दाखल केली असताना हीच भूमिका केंद्र सरकारने जर तेव्हा घेतली असती, तर आज १०५ नगरपंचायतींमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवता आले असते. हा अन्याय ओबीसींवर झाला नसता. परंतु महाराष्ट्रावर ती आपत्ती आली होती, तेव्हा मात्र केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. आज मध्यप्रदेश, कर्नांटकसह पाच-सहा राज्यांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हा मात्र केंद्र सरकारने लागलीच भूमिका बदलविली आणि वेळ वाढवून मागणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले, आपल्यावर वेळ आली म्हणजे कसे वाटते, याचा अनुभव आता केंद्रातील मंडळी घेत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले, आता १२ बलुतेदारांची मुलेही होतील डॉक्टर...

आरक्षण हे घटनेने दिलेले आहे, तो प्रत्येक समाजाचा संविधानिक अधिकार आहे. शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय, असे तिन्ही टप्प्यांत आरक्षण मोजले जाते. पहिले दोन गृहीत धरत असताना तिसऱ्याला सोडता येत नाही. त्यामुळे आमच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय निश्‍चितच सकारात्मकपणे विचार करेल आणि तो आपल्याला आज बघायला मिळेल. आजचा निकाल हा ओबीसींच्याच बाजूने लागेल, असा विश्‍वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com