Navnit Rana : खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अकोला पोलिसात तक्रार दाखल...

खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) पोलिस अधिकाऱ्यांवर ओरडत होत्या आणि सतत लव्ह जिहाद चा उल्लेख करीत होत्या. हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते.
MP Navnit Rana
MP Navnit RanaSarkarnama

अकोला : अमरावतीमधील (Amravati) एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात राडा केला होता. ‘माझा कॉल रेकॉर्ड का केला, असे म्हणत त्यांनी पोलिस (Police) अधिकाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला होता. त्यावेळी त्यांनी सतत लव्ह जिहाद चा उल्लेख करून दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत अकोला येथील जावेद झकेरिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जावेद झकेरिया हे अकोल्याचे (Akola) रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. तक्रारीमध्ये ते म्हणतात की, मी सोशल मिडियावर ॲक्टीव आहे. ७ सप्टेंबर रोजी सोशल मिडियावर व्हिडिओसह एक बातमी फ्लॅश झाली होती. त्यामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) पोलिस अधिकाऱ्यांवर ओरडत होत्या आणि सतत लव्ह जिहाद चा उल्लेख करीत होत्या. हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. पण हेतुपुरस्सर दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेले असल्याचा त्यांचा आरोप होता.

मुस्लीम समाजातील मुलावर कारवाई करण्यासाठी त्या पोलिसांवर दबाव आणत होत्या. हा प्रकार अमरावती येथे झाला असला तरी मिडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वत्र पसरली. खासदार राणा यांच्या त्या कृत्याचे पडसाद निश्‍चितच उमटणार आहे. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात येत आहे. हिंदू मुली मुस्लीम मुलांसोबत पळून गेल्याच्या घटना सर्वत्र घडल्या आहेत. अशा खोट्या बातम्या खासदार राणा पसरवीत आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी शांतता भंग करणारी कृत्ये करीत आहेत.

MP Navnit Rana
hindu-muslim politics|नवनीत राणा तोंडघशी पडल्या; बेपत्ता तरुणी म्हणाली, माझी बदनामी थांबवा...

खासदार राणा यांचे हे कृत्य स्पष्टपणे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जावेद झकेरिया यांनी केली आहे. काल भीम आर्मीच्यावतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज अकोल्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेईल, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in