तक्रारकर्त्यांना शब्द फुटत नव्हते, मग पालकमंत्र्यांनी लेखी तक्रारींवरून घेतली दखल...

जिल्हाधिकारी व नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाशी संबंधित बऱ्याच तक्रारी होत्या. पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी १५ दिवसांच्या आता तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama

नागपूर : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल लोकसंवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) घेतला. गेल्या दहा वर्षांपासून काही प्रश्न सुटले नसल्याचे काही नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. अशा जटील व कठीण प्रश्नांना त्यांनी स्वतःकडे घेतले. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला पत्र द्यावे, या समस्यांचा निपटारा स्वतः लक्ष घालून करेल, असे आश्‍वासन नितीन राऊत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पालकमंत्री लोकसंवादमध्ये तक्रारींचा पाऊस पडला. यात सर्वाधिक तक्रारी महानगर पालिकेशी संबंधित होत्या. जिल्हाधिकारी व नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यास कार्यालयाशी संबंधित बऱ्याच तक्रारी होत्या. पालकमंत्री नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी १५ दिवसांच्या आता तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, याशिवाय सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांपासून काही प्रश्न सुटले नसल्याचे काही नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. अशा जटील व कठीण प्रश्नांना त्यांनी स्वतःकडे घेतले. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला पत्र द्यावे, या समस्यांचा निपटारा स्वतः लक्ष घालून करेल. तर काही महत्वपूर्ण प्रश्न मंत्रालयात बसून सोडवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी तक्रारकर्त्यांना दिले.

आजच्या लोकसंवाद कार्यक्रमात एकूण १९२ प्रकरणांवर चर्चा झाली. यात जिल्हाभरातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सार्वजनिक सोसायटी, पट्टेधारक यांचा सहभाग अधिक होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्या सांगताना शब्द फुटत नव्हते. अशावेळी त्यांच्या लेखी तक्रारीवरून न्याय देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. काही समस्या त्यांनी जागेवरच निकाली काढल्या. शंभर तक्रारीवर त्यांनी पुढील आठवड्यात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांना कालमर्यादेत पूर्ण करायच्या समस्यांबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात ज्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टोकन व्यवस्था..

सेतू केंद्रातून संबंधित तक्रारकर्त्याला टोकन देण्यात येत होते. टोकन मिळालेल्या नागरिकांना बचत भवनामध्ये प्रवेश दिला जात होता. इथे पालकमंत्र्यांनी तक्रारकर्त्याची गाऱ्हाणी ऐकून घेतले. शांततेत सर्व प्रक्रिया पार पडली.

Nitin Raut
उर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक; अदानींना पाठवली नोटीस

पालकमंत्री आले तास भर उशिरा..

लोससंवादाची वेळ सकाळी ११ वाजताची होती. त्यानुसार लोक उपस्थित झाले. परंतु पालकमंत्री १ तास उशिरा आले. त्यामुळे लोकांना उन्हात तात्कळत वाट पाहावी लागली. लोकसंवादच्या स्थळी नागरिकांची गैरसोय होता कामा नये यासाठी प्रशासनाकडे नियोजन करण्यात आले. आवश्यक तयारही करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण लोकसंवाद शांततेत पार पडला. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पीयूष चिवंडे, शेखर घाडगे, शिवराज पडोळे, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अविनाश कातडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विभागनिहाय तक्रारी..

मनपा - ५४

जिल्हाधिकारी कार्यालय - ४६

नासुप्र - २०

सिटी सर्वे - १५

जिल्हा परिषद - १०

एमईसीबी - १३

म्हाडा - २

आदिवासी विभाग - ६

पीडब्ल्यूडी - ४

पोलिस - ८

नगर रचना - १

कृषी - २

नगर परिषद -२

इतर - १०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com