Online प्रणाली अन् कर्मचारी संघटनांमुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई...

for damages : नुकसानीसाठी १५७ कोटीचे पॅकेज जाहीर केले होते.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Farmers suffered huge losses : यावर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. नुकसान भरपाईची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. परंतु या पद्धतीला काही कर्मचारी संघटनांचा विरोध असल्याने ही रक्कम रखडली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Farmers Association) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचा मोर्चा व जलसमाधी आंदोलनानंतर राज्य सरकारने बुलढाणा (Buldhana) व वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी १५७ कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी दोन टप्प्यांत १७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु सदर नुकसान भरपाईची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. परंतु या पद्धतीला काही कर्मचारी संघटनांचा विरोध असल्याने ही रक्कम रखडली आहे.

प्रशासनाच्या व कर्मचाऱ्यांच्या वादात व ऑनलाईनच्या या भानगडीत शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी आज रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांची भेट घेऊन अतिवृष्टीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. यावर्षी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व संततधार पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रविकांत तुपकरांनी शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चा काढला होता.

मुंबई येथील जलसमाधी आंदोलनानंतर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून संबंधित बहुतांश मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्य सरकारने बुलढाणा व वाशीम जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपये पॅकेज जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी नापिकीचे दोन टप्प्यात १७४ कोटी रु. मंजूर झाले आहेत. असे असतांना सदर रक्कम ही ऑनलाईन प्रणालीने जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : तुपकर म्हणाले, पोल्ट्री लॉबी केंद्र सरकारवर दबाव आणत आहे...

महाआयटी कंपनीला कंत्राट दिले आहे. परंतु शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम हे जिल्हा महसूल व कृषी प्रशासनाकडे दिले आहे. परंतु या ऑनलाईन पद्धतीला काही कर्मचारी संघटनांचा विरोध असल्याने शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम थंडावले आहे. शेतकऱ्यांच्या याद्या १० डिसेंबर २०२२ पर्यंत तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. परंतु अजूनही याद्या तयार झाल्या नाहीत. या सर्व गोंधळात शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या सर्व गोंधळावर मार्ग काढून तातडीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम अदा करण्याची मागणी केली.

राज्य सरकारनेही या संदर्भात तातडीने तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा तुपकरांनी यावेळी दिला. यापूर्वी नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसानीचे (नापिकीचे) पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायचे त्या याद्या सुद्धा नैसर्गिक आपत्ती विभागाकडे तयार आहेत. परंतु आता पुन्हा याद्या जमा करायच्या व इंग्रजी मध्ये समाविष्ट करायच्या, ही प्रक्रिया किचकट व वेळ लागणारी आहे. त्यामुळे या प्रक्रियेला काही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. प्रत्येक विभाग म्हणतो शेतकऱ्यांच्या याद्या जमा करण्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे गोंधळाची परिस्थती तयार झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in