DPCच्या बैठकीस आयोगाची मंजुरी, पालकमंत्री फडणवीस ऑनलाइन होणार सहभागी!

Nagpur : पहिल्या टप्प्यात जवळपास १३० कोटी रुपये मिळाले होते.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Nagpur District Planning Committee News : जिल्हा नियोजन समितीसाठी (डीपीसी) वर्ष २०२३-२४ साठी एक हजार कोटींचा आराखडा नियोजन विभागाने तयार केला असून उद्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

वर्ष २०२२-२३ करीत जिल्हा नियोजन समितीला ६२५ कोटी तर शहरी भागात विकास कामांसाठी ५३ कोटी असा एकूण ६७८ कोटींचा निधी मंजूर झाला. पहिल्या टप्प्यात जवळपास १३० कोटी रुपये मिळाले होते. त्यातून जवळपास ४० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तापरिवर्तन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व कामांना स्थगिती दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister) परवानगीने कामे करण्याचे आदेश दिले.

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस वेळ झाला. नवीन पालकमंत्र्यांनी जुन्या पालकमंत्र्यांकडून निश्चित करण्यात आलेल्या कामांना स्थगिती दिली. नंतर शासनाकडून २७० कोटींचा निधी देण्यात आला. जिल्ह्याला ४०० कोटींचा निधी मिळाला असून त्यातील १० टक्केच निधी आतापर्यंत खर्च झाल्याची माहिती आहे. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित या बैठकीला पालकमंत्री फडणवीस ऑनलाइन सहभागी होतील. या बैठकीत वर्ष २०२२-२३ च्या कामांचे पुनर्नियोजन करण्यात येणार असून वर्ष २०२३-२४ च्या आराखड्यात मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०२३-२४ साठी एक हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Devendra Fadanvis
Cabinet Decision : शिंदे फडणवीस सरकारचा 'हा' मास्टरस्ट्रोक, कार्यकर्त्यांची होणार बल्ले बल्ले

स्थगिती उठणार?

डीपीसीच्या कामांवर स्थगिती आहे. यामुळे शेकडो कोटींची कामे रखडली आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता आहे. त्यामुळे त्यानंतरच्या बैठकीस स्थगिती उठवल्यास प्रशासनाला निधी खर्च करणे शक्य होणार नाही. निधी खर्च करण्यास दोन महिन्याचाच वेळ मिळणार आहे. त्यामुळे या बैठकीत कामांचे पुनर्नियोजन करून त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी

आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने बैठकी घेण्यास मंजुरी देण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार केला. आयोगाने काही अटी, शर्तीच्या आधारे बैठकीस मंजुरी दिल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com