
Prashant Pawar on Coal Washri : नागपूर जिल्ह्यात कोल वॉशरींनी नियमांची ऐसीतैसी करत जमिनीतून पाण्याचा उपसा करणे आणि इतर कामे सुरूच ठेवली आहे. शेतकऱ्यांनी याचा विरोध केला असता प्रकरण न्यायालयात नेले आणि सुरक्षेची मागणी केली. या कृतीचा विरोध जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.
स्वतःची अनियमितता उघडकीस येऊ नये याकरिता पारशिवनी तालुक्यातील महा मिनरल मायनिंग बेनेफिकेशन कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सामाजिक संघटना यांना आंदोलन करू देऊ नका आणि आम्हाला पोलिस संरक्षण प्रदान करा, अशी मागणी केली आहे. याविरोधात जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने मध्यस्थी याचिका दाखल करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करण्यात येणार आहे.
कोल वॉशरीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. जमिनीतील पाण्याचा अवैधपणे उपसा केला जात आहे. प्रारंभी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरी बंद करण्याची नोटीस कंपनीला बजावली होती. तसेच २२ प्रकारच्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आठ दिवसांनंतरही कुठलीच सुधारणा केली नसताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरीला परवानगी दिली. त्यामुळे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.
आंदोलनात जय जवान जय किसान संघटना सहभागी झाली होती. संघटनेच्यावतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोरही धरणे आंदोलन केले होते. आमदार सुनील केदार यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. कारवाईची शक्यता असल्याने कंपनीने स्वतः न्यायालयात याचिका दाखल करून संरक्षण मागितले आहे.
हा एक प्रकारे आंदोलक आणि शासकीय यंत्रणाचे हात बांधणारा आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे दर्शवून शासकीय यंत्रणेलाही हतबल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले.
आमच्या संघटनेलाही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र ती आमच्यापर्यंत पोहचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. सरपंचांना नोटीस आल्याने याची माहिती मिळाली. हे सर्व करीत असताना कारवाई होऊ नये, याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करण्यात आले नाही. दुसरीकडे जिल्हाधिकारी, (Collecor) संबंधित पोलिस ठाणे, स्थानिक स्वराज्य संस्था, शेतकरी (Farmers) आदींना प्रतिवादी केले असल्याचे पवार यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
न्यायालयाला वस्तुस्थिती सांगू..
सहा मार्चला या प्रकरणावर सुनावणी आहे. आपण उपस्थित राहून न्यायालयाला (Court) वस्तुस्थिती सांगू आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करू, असे प्रशांत पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जय जवानचे समन्वयक विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.