नितीन गडकरींच्या नागपुरातच पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महाग!

नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पर्यायी इंधनाकडे वळण्याची भूमिका हिरीरीने मांडत असतात.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama

नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला (CNG) पसंती दिली जात होती. मात्र, आता सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पर्यायी इंधनाकडे वळण्याची भूमिका हिरीरीने मांडत असतात. आता त्यांच्या नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीएनजी महागला आहे.

नागपुरात सीएनजीचा दर प्रतिकिलो 120 रुपये आहे. याचवेळी नागपुरात पेट्रोल प्रतिलिटर 109.75 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 92.51 रुपये आहे. देशात सीएनजीचा सर्वाधिक दर हा नागपुरात आहे. स्वस्त इंधन पर्याय मानला जाणारा सीएनजी आता पेट्रोल, डिझेलपेक्षा महागडा ठरत आहे. यामुळे सीएनजीकडे वळालेल्या वाहनचालकांची पंचाईत होत आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी सीएनजीचा तुटवडा असल्याने वाहनचालकांच्या लांबलचक रांगी सीएनजी पंपासमोर लागल्याचे चित्र आहे.

अधिकाऱ्यांनी मात्र, याचे खापर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर फोडले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाले आहे. यामुळे सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हरियानातील कंपनीला नागपूरमध्ये सीएनजीचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. काही दिवसांत सीएनजीचा दर प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांवर येतील.

Nitin Gadkari
महागाईचा भडका! सीएनजीवर गाडी चालवणंही आता महागलं

खनिज तेलाच्या भावाचा भडका आणि केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने सीएनजी सातत्याने महागताना दिसत आहे. रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर एक रुपयाने वाढवण्यात आला आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 57.51 रुपयांवर गेला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर 59.58 रुपयांवर पोचला आहे.

Nitin Gadkari
राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटला; अधिवेशनात अभिभाषणाला बोलावलंच नाही!

केंद्र सरकारने मागील वर्षी नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली. यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी, बस आणि रिक्षांसोबत खासगी कारचालकांना होत आहे. स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड यामुळे बसू लागला आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा संघटना आता भाडेवाढ करण्याची मागणी करू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com