Amravati Graduate : मतमोजणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू..

Circle Officer : अस्वस्थ वाटल्याने घरी परत गेल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
Amravati Graduate Constituency
Amravati Graduate ConstituencySarkarnama

Amravati Graduate Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी दरम्यान अस्वस्थ वाटल्याने घरी परत गेल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. काल मतमोजणी सुरू असताना रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

शाहूराज चैतुजी खडसे (वय ५५, रा. ग्रेटर कैलासनगर, महादेव खोरी) असे निधन झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना बुधवारी १ फेब्रुवारीपासून तैनात करण्यात आले होते. त्यात खडसे यांचाही समावेश होता, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

कर्तव्यावर असताना रात्री अस्वस्थ वाटल्याने त्यांनी रात्रीच घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेवण केल्यानंतर खडसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाइकांनी लगेच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना खडसे यांचा मृत्यू झाला, असे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इर्विन रुग्णालयाच्या (Hospital) शवागारात पाठविण्यात आला. आज उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शाहूराज खडसे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्रात अमरावती व नाशिक येथे पदवीधर, तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद (संभाजी नगर) येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका (Election) झाल्या.

Amravati Graduate Constituency
Shivsena Symbol News : शिंदेंनी निवडणूक आयोगात वेळेवर टाकला डाव; ठाकरेंची कोंडी? : लेखी युक्तीवादातील महत्त्वाचा मुद्दा समोर

काल सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अमरावती (Amravati) वगळता उर्वरित चारही ठिकाणचे निकाल कालच लागले. पण अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी तब्बल ३० तास चालली. निश्‍चित त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर होता. कर्मचारीसुद्धा कंटाळले होते. अखेर आज दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल लागला आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

मंडळ अधिकारी (Circle Officer) खडसे अस्वस्थ वाटत असल्यामुळे जेव्हा काल घरी गेले होते, तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांपैकी कुणालाही असे वाटले नाही, की त्यांच्यासोबत असे काही होईल. पण रात्रीतूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांमध्येही ताण पसरला. काल आपल्यासोबत काम करीत असलेला सहकारी असा अचानक निघून गेला, याचे अतीव दुःख मतमोजणीच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com