Buldhana Politics| MLA Sanjay Gaikwad
Buldhana Politics| MLA Sanjay Gaikwad

चून चून के मारे जायंगे; बुलडाण्यातील राड्यानंतर आमदार गायकवाडांची शिवसेनेला थेट धमकी

Buldhana Politics| MLA Sanjay Gaikwad| शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात शनिवारी राडा केला होता

बुलढाणा : बुलडाण्यामध्ये शनिवारी शिवसेना (Shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde Group) गटातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर आली होती. शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात आमच्या नेत्यांवर टीका का करता? असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. आता हा वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यक्रमानंतील राड्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनीही धमकी दिल्याने शिवसैनिक आणि बंडखोर आमदार गायकवाड यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, अशी थेट धमकीच बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे." इतकेच नव्हे तर, पोलीस होते म्हणून कालच्या राड्यात कमी झाले, मात्र पुढच्या वेळी आणखी जास्त राडा होईल" असा इशारा ही गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Buldhana Politics| MLA Sanjay Gaikwad
Shiv Sena : पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करणे महाराष्ट्राचा अपमान, रामदेव बाबा, मुख्यमंत्र्यांना टोला

बुलडाण्यात शिवसेनेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यातच आला होता. मात्र या कार्यक्रमात बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, असे म्हणत या कार्यक्रमात राडा करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. खुर्च्यांची तोडफोड करत हा कार्यक्रम उधळून लावला.

यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची पण झाली. खुर्च्यांची तोडफोड करत कुणाल गायकवाड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्यात आला. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला. पण या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनीही पुन्हा शिवसेनेविरोधात असं चिखाणीखोर विधान केल्याने बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com