Chitra Wagh News : चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, तुम्ही सेलीब्रेशनसाठी आलेल्या नाहीत !

Nagpur : जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे यांना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खडेबोल सुनावले.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

BJP Leader in Meeting of Women wing : हिंगणा तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांची आतापर्यंत एकही बैठक जिल्हाध्यक्षांनी घेतली नाही, अशी ओरड महिलांनी केली. त्यामुळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे यांना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खडेबोल सुनावले. उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांचेही पक्ष संघटनेच्या विषयावरून चांगलेच कान टोचले. यामुळे या बैठकीची चर्चा रंगू लागली आहे. (Sandhya Gotmare was given a speech by State President Chitra Wagh.

महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी महिला मोर्चा नागपूर जिल्हा व तालुका (मंडळ) कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागपूर ग्रामीणमधील १३ तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची राज्यातील सर्व जिल्ह्यांत पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यानुसार महिला मोर्चा नागपूर जिल्हा व तालुका मंडळ महिला पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली परवा खरबी परिसरात पार पडली.

बैठकीला १३ तालुक्यातील महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास ८०० च्या घरात महिला पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष संध्या गोतमारे, प्रदेश महिला महामंत्री अश्विनी जिचकार, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, संघटन मंत्री किशोर रेवतकर, जिल्हा समन्वयक लता गावंडे, प्रसिद्धी प्रमुख सुधा सेलोकर, महामंत्री माया पाटील, शुभांगी गायधने, राजू भोले, प्रतिभा गवळी, उपाध्यक्ष शालिनी बर्वे, लतेश्वरी काळे, वनमाला चौरागडे, मंत्री पूर्णिमा दुबे, शालिनी कंगाली, मानकर यांच्यासह सर्व जिल्हा व २० मंडळ कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी प्रत्येक तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी आपले नाव, पद सांगून आत्तापर्यंत कोणते पक्ष संघटनेचे काम केले, याची माहिती देण्याची सूचना दिली. यानुसार नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, सावनेर, काटोल, रामटेक, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, पारशिवनी, उमरेड या तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष गोतमारे यांनी आपल्या तालुक्यात एकही बैठक पक्ष संघटने संदर्भात लावली नाही, अशी माहिती दिली.

Chitra Wagh
Chitra Wagh News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागला, याचे दुःख आहेच : चित्रा वाघांनी दिली कबुली

अनेकांना कागदोपत्री पदांचे वाटप करण्यात आले. मात्र साधे नियुक्तीपत्रही मिळाले नाही. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असताना महिलांसाठी सुरू केलेल्या अनेक योजनाही तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचल्या नाहीत. कारण जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले नसल्याची ओरड महिला पदाधिकाऱ्यांनी केली. नमो ॲप एक करोड सेल्फी या उपक्रमाचीही माहिती नसल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

..म्हणून चिडल्या चित्रा वाघ !

अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपले पद कोणते आहे, हे सुद्धा माहीत नव्हते. ग्रामीण भागातील महिला पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला आघाडीच्या नागपूर जिल्हाध्यक्ष संध्या गोतमारे यांना चांगलेच धारेवर धरले. पक्ष संघटनेने पक्ष वाढीसाठी दिलेला कार्यक्रम आपल्याला राबवता येत नाही का, असे म्हणत असे खडे बोल सुनावले. आपला पक्ष देशात नंबर वनचा पक्ष असताना महिला पदाधिकाऱ्यांची अशी दयनीय अवस्था पाहून चित्रा वाघ यांनी चीड व्यक्त केली.

Chitra Wagh
Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी केला 'वंदे भारत एक्सप्रेस'ने प्रवास; पाहा फोटो!

येवढा नट्टा-पट्टा कशाला ?

या बैठकीला येताना अनेक महिला पदाधिकारी महागड्या साड्या परिधान करून आल्या होत्या. महिला पदाधिकाऱ्यांची वेशभूषा पाहूनही प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतापल्या. तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या नाहीत. पक्षाच्या (BJP) बैठकीसाठी आल्या आहात. किमान सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असे सांगून त्यांचे चांगलेच कान टोचले. यानंतर पुन्हा महिनाभराच्या कालावधीत नागपूर (Nagpur) जिल्ह्याची आढावा बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक तालुक्यात घ्या बैठका..

यामुळे किमान जिल्हाध्यक्षांनी सर्व तालुक्यांत बैठका घेऊन सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवावी. प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी समजावून सांगावी. पुढील आढावा बैठकीत महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी सक्रियरित्या काम करीत असल्याचे दिसून आले पाहिजे, असा सूचना वजा इशाराही वाघ (Chitra Wagh) यांनी दिला. प्रदेशाध्यक्षांनी महिला पदाधिकाऱ्यांना चांगलेच फाईलवर घेतल्याने ही बैठक वादळी झाल्याची चर्चा महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com