Chinchwad : पोटनिवडणूक चिंचवडची, फटका पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांना...

Code of Conduct for Elections : निवडणुकीच्या आचारसंहितेचा पहिला फटका पिंपरी-चिंचवड शहराला बसला.
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationSarkarnama

Pimpri Chinchwad News : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक (By-elections) काल जाहीर झाली. निवडणुकीच्या आचारसंहितेचा पहिला फटका पिंपरी-चिंचवड शहराला बसला असून महिन्यातून दोनदा होणाऱ्या पालिकेच्या जनसंवाद सभा आता होणार नाहीत.

चिंचवडच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीचा फटका उद्योगनगरीतील भोसरी आणि पिंपरी या इतर दोन विधानसभा मतदारसंघांना बसला आहे. कारण तेथील पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांत होणाऱ्या जनसंवाद सभा आता होणार नाहीत. अगोदरच या सभांत वारंवार तक्रारी मांडूनही त्या मार्गी लागत नसल्याची रहिवाशांची ओरड आहे.

त्यामुळे हा जनसंवाद उपक्रम सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या दहा महिन्यांपासून फार्स ठरला आहे. त्यात, तर आता त्या होणारच नसल्याने आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाल्याचे काही भोसरीकरांनी सांगितले. याबाबतचा आदेश प्रभारी पालिका आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी आज सायंकाळी काढला.

पिंपरी-चिंचवड पालिकेची मुदत गेल्यावर्षी १३ मार्चला संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रशासकीय कारभार शहरात सुरू झाला.नगरसेवक नसल्याने तत्कालीन पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात म्हणून दर आठवड्याच्या सोमवारी जनसंवाद सभा भरविण्यास मार्चपासूनच भरविण्यास सुरुवात केली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri-Chinchwad News : राज्यपालांच्या विरोधात सर्व संघटना एकवटल्या; थेट पिंपरी-चिंचवड बंद ठेवणार

शेखरसिंह हे नवीन आयुक्त आल्यानंतर महिन्यातून चारदा होणाऱ्या या सभा गेल्या नोव्हेंबरपासून दोनदाच म्हणजे दुसऱ्या,चौथ्या सोमवारी भरविण्यात येऊ लागल्या होत्या. विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आता,तर त्या होणारच नाहीत.त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्यासाठी रहिवाशांना धावाधाव करावी लागणार आहे.कारण त्यांना आपल्या अडचणी आता नगरसेवक नसल्याने त्यांच्याकडे घेऊन जाता येणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com