तिच्यासमोरच कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, काटोलमधील नागरिक झाले आक्रमक…
Katol NagpurSarkarnama

तिच्यासमोरच कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले, काटोलमधील नागरिक झाले आक्रमक…

नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोलमधील (Katol) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धंतोलीमध्ये ही घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

काटोल (जि. नागपूर) : २५ ते ३० कुत्र्यांचा कळप गेल्या कित्येक महिन्यांपासून हैदोस घालतो आहे. अनेकदा नागरिकांनी नगर परिषदेत (Nagar Parishad) तक्रारी केल्या, निवेदने दिली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता कुत्र्यांच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकला ठार झाला आहे. त्यानंतर काटोल शहरातील द्वारकानगरीचे नागरिक आक्रमक झाले आहेत.

नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोलमधील (Katol) उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धंतोलीमध्ये ही घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. विराज जयवार हा ५ वर्षांचा मुलगा आपल्या घरासमोर फिरत होता, तेव्हा त्याची मोठी बहीण त्याच्या सोबत होती. तेव्हाच एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. विराज आपल्या शक्तीनिशी जिव वाचवण्यासाठी पळाला, त्याची बहिणही त्याला वाचवण्यासाठी धावली, आरडाओरडही केली. पण त्या कुत्र्याने विराजला पकडलेच आणि काही अंतरापर्यंत ओढत नेले. तेथे १० ते १२ कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. बहिणीची आरडाओरड ऐकून काही लोक विराजला वाचवण्यासाठी पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. विराज गतप्राण झाला होता.

विराजला जवळच वाळूच्या ढिगाऱ्यावर ओढत नेऊन त्याचे लचके तोडले. अंगावरील कपडे फाडले, डोक्याचा भाग चेहरा ,गुप्तांग, आतडे पोटाचा भागाचे लचके तोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयवार परिवार पारडसिंगा येथील असून मुलांच्या शिक्षणाकरिता पत्नी व दोन मुलं विराज, मुलगी देवांशु वय (1 वर्ष) सोबत चार जण धंतोली येथे स्वतःचे घरी राहत होते. मोठ्या भावाची मुलगी विधी पारडसिंगा येथून सुट्यांमध्ये काटोल येथे आली होती. आज सकाळी परिवारातील सर्व मंडळी उठली. पुतणी व विराज धंतोली बगीचा येथे फिरायला जात असल्याचे सांगितले. आणि रस्त्यात काहीच अंतरावर अशी दुर्दैवी धक्कादायक घटना घडली. विराजचे वडील राजेंद्र मारोतराव जयवार (38) यांनी काटोल पोलिसात तक्रार नोंदविली आहे. सकाळची वेळ असल्याने रहदारी कमी होती. घटना बघून वाटसरूंनी व वस्तीतील नागरिकांनी विराजला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ते असफल ठरले. त्यानंतर लोकांचा संताप उसळला.

Katol Nagpur
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

तक्रारीकडे दुर्लक्ष...

नागरिकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष केले. मिळालेल्या माहितीनुसार वस्तीतील नागरिकांवर यापूर्वी कुत्र्यांनी अनेकदा हल्ले केले. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल नगरपरिषद तसेच स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यापूर्वी मूक प्राणी, डुकराचे पिल्लू, शेळीचे पिल्लू यांच्यावरही कुत्रे तुटून पडले आहेत. आता बालकाचा जीव घेण्यापर्यंत कुत्र्यांची मजल गेली. अनेकदा भटके कुत्रे नागरिकांवरही हल्ले करतात. मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे आज विराजचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याला कोण जबाबदार असे लोक संतापाने विचारत आहेत. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुणाचेही हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडल्यानंतरही नगर परिषद प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे आता काटोल शहरातील नागरिक खवळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in