विधान परिषद निवडणूक हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा...

Ramdas Athawale|Uddhav Thackeray : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
विधान परिषद निवडणूक हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा...
Ramdas Athawale, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

अमरावती : "भारतीय जनता पार्टीने (BJP) उभे केलेले पाचही उमेदवार जिंकून येणार असून यासाठी भाजप कडून राज्यसभेच्या निवडणुकीसारखी रणनीती तयार करण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार हरल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी आरपीआयचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केली आहे. त्यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला. (Ramdas Athawale, Uddhav Thackeray Latest Marathi News)

Ramdas Athawale, Uddhav Thackeray Latest News
महाविकास आघाडी पुढील पाचशे वर्षे येणाऱ्या सरकारला दिशादर्शक ठरेल...

आठवले म्हणाले, सत्तेत असूनही शिवसेनेने जर आपली जागा हरली तर मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने रणनीती आखून आपले उभे केलेले तीनही उमेदवार जिंकून आणले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणीस यांचा मोठा वाटा होता. आताही भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

अनेक अपक्ष आमदार आमच्या सोबत असून त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. याबरोबर शिवसेनेचे आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज आहेत. सत्तेत असूनही राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेची जागा शिवसेनेने हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

Ramdas Athawale, Uddhav Thackeray Latest News
एमआयएमचे एक मत राष्ट्रवादीने वळवले : खडसे, निंबाळकरांचे टेन्शन गेले

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आठवले म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, आपली मते फुटणार नाही. परंतू, सर्वांनी आपले मते सांभाळावे. मात्र त्यांचे मते फुटणार असल्याची कुणकूण राऊतांना लागली असल्यानेच त्यांनी असे वक्तव्य केलं आहे, असा टोला देखील आठवलेंनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in