मुख्यमंत्री साहेब, विजयोत्सव टाळा अन् शेतकऱ्यांकडे जरा लक्ष द्या !

कशासाठी निवडून दिलं. शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. आज आम्हाला शेतकरी फोन करतात आणि रडून आपबीती सांगतात, असे तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले.
Eknath Shinde and Ravikant Tupkar
Eknath Shinde and Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : या पेरणीच्या काळात राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना खत मिळेनासे झाले आले. अनेक ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळाले त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी पडला नाही. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली आहे. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Farmers association) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला.

ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलं, त्यांचं काम खऱ्या अर्थाने लोकांना आधार देणे आणि त्यांची सेवा करण्याचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनता बघत आहे की, लोकप्रतिनिधी पंचतारांकित हॉटेलांमध्ये इकडून तिकडे पळत आहे. मस्ती, मौजमजा करत आहेत. हा प्रकार शेतकऱ्यांना अजिबात आवडलेला नाहीये. महाराष्ट्रातल्या (Maharashtra) शेतकऱ्यांना (Farmers) आता लाज वाटत आहे की कोणत्या लोकांना निवडून दिलं आणि कशासाठी निवडून दिलं. शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. आज आम्हाला शेतकरी फोन करतात आणि रडून आपबीती सांगतात, असे तुपकर म्हणाले.

आता दाद कुणाकडे मागायची आमदाराकडे, खासदाराकडे अशी विचारणा शेतकरी करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते खुर्ची वाचवण्यात, अन् खुर्ची मिळविण्यात लागलेले आहेत. त्यामुळे आता विश्‍वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना स्वाभिमानीची विनंती आहे की, त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांकडे तात्काळ लक्ष द्यावे. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट कोसळलेले आहे आणि त्यांना आधाराची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तात्काळ आधार द्यावा, असे तुपकर म्हणाले.

Eknath Shinde and Ravikant Tupkar
रविकांत तुपकर भडकले; भुरट्या दादागिरीला भीक घालत नाही...

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून परिस्थिती हाताळली नाही, तर शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींवरचा विश्‍वास उडून जाईल. जयजयकार तर दूरची गोष्ट राहिली, पण राजकारणी लोकांना शेतकरी साधा नमस्कारही घालणार नाही, अशी परिस्थिती आजच्या आमदार, खासदारांनी करून ठेवली असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. आतातरी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे थांबवा, विजयोत्सव टाळा आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, असे आवाहन तुपकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तमाम राजकारणी लोकांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com