छोटू भोयर काल सकाळी आले कॉंग्रेसमध्ये, अन् १२ तासांच्या आत मिळाले तिकीट...

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी BJP's Senior Leaders माझ्यावर अन्याय केला आहे. आता यापुढे कुचंबणा सहन करायची नाही. म्हणून भाजप सोडत असल्याचे छोटू भोयर Chotu Bhoyar यांनी सांगितले.
छोटू भोयर काल सकाळी आले कॉंग्रेसमध्ये, अन् १२ तासांच्या आत मिळाले तिकीट...
Chotu Bhoyar with Congress LeadersSarkarnama

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांनी काल सकाळी ११ वाजता येथील देवडीया भवनात कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि १२ तासांच्या आत त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

केवळ विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून आपण कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची बाब छोटू भोयर यांनी काल साफ नाकारली होती. पण तिकिटाची कमिटमेंट करूनच त्यांनी कॉंग्रेस प्रवेश घेतला, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कालच्या प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असणार आहेत. मी ३४ वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले. या ३४ वर्षात पक्षाने मला खूप काही दिले. पण मीसुद्धा पक्षासाठी झिजलो आहे. जेव्हा महानगरपालिकेत बोटांवर मोजण्याइतके नगरसेवक होते, तेव्हापासून ते आज सत्ता असेपर्यंत पक्षासोबत इमाने इतबारे राहिलो. पण माझ्यानंतर पक्षात आलेले लोक मोठे झाले. पण मी येवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही महानगरपालिकेच्या बाहेर पडू शकलो नाही. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. आता यापुढे कुचंबणा सहन करायची नाही. म्हणून भाजप सोडत असल्याचे छोटू भोयर यांनी सांगितले.

Chotu Bhoyar with Congress Leaders
भाजप नेते छोटू भोयर महाविकासकडून लढणार;पाहा व्हिडिओ

यापूर्वीही मी दक्षिण नागपूरमधून विधानसभेची उमेदवारी मागितली. तेव्हाही मी सक्षम होतो. पण काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याला तिकीट न देता नेत्यांनी त्यांच्या मित्रांना तिकिटांची खिरापत वाटली. त्यामुळे भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत. अनेकांच्या मनात खदखद आहे. ही खदखद आता या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडणार आहे. मी एकटा भाजपमधून बाहेर पडलो. त्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही, असा गोड गैरसमज आजही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे. पण माझ्यासोबत माझ्यासारखेच संघाचे आणि भाजपचे कट्टर समर्थक आहेत. आता वेळ आलीच आहे. काहीच दिवसांत भाजप नेत्यांना ते दिसणार आहे, असेही छोटू भोयर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in