Chhatrapati : छत्रपतींना तुम्ही कधीच सन्मानाने वागवलं नाही, भाई जगतापांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला!

Bhai Jagtap : आजचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेते. पण...
Bhai Jagtap
Bhai JagtapSarkrnama

Mumbai Legislative Council News : छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊंच्या जिजाऊ सृष्टी केव्हा साकारणार, असा प्रश्‍न करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी आज सभागृहात सरकारवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवत छत्रपतींनी तुम्ही कधीच सन्मानाने वागवले नाही, असे भाई जगताप म्हणाले.

छत्रपतींनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या साध्या देठाचेही नुकसान करणाऱ्यांचे हातपाय तोडले. हे धैर्य महाराजांमध्ये होते. आजचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेते. पण एकही काम तसे होत नाही. आतापर्यंत केवळ घोषणा केल्या. काही हजार कोटी, काही लाख कोटी. पण आणणार कुठून? घोषित करायचे एक हजार कोटी देताना द्यायचे १०० कोटी. हे असेच चालत राहिले तर. प्रकल्प पूर्ण कसे होणार, असा प्रश्‍न भाई जगताप यांनी उपस्थित केला.

अदानीला सर्वकाही निर्धोक करता येतं..

हे सरकार मोठमोठाल्या जाहिराती देऊन स्वतःची वाह वा करवून घेत आहे. मी स्वतः ४० वर्ष स्वतःचा पेपर चालवला. पण नियम घालून दिला होता, की माझा फोटो छापायचा नाही आणि तो नियम पाळला. जाहिरातींच्या बाबतीत सरकारनेही काही नियम पाळले पाहिजे. छत्रपतींना कधीही सन्मानाने वागवलं नाही, असे पंत अनेक आहेत. २१व्या शतकातील जलपूजन बघितलं. त्यात एक माणूस मेला. या घटनेनंतर बळी द्यावा लागतो, असे वक्तव्य नेत्यांनी केले, तेसुद्धा पंतप्रधानांच्या उपस्थितीत. ही शरमेच बाब आहे, असे ते म्हणाले.

‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे आम्ही करत राहणार आणि वारंवार करणार. १२ वेळा मला अटक झाली आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. खोटं बोलण्यात मोदींसह तुमचा हात कुणी पकडू शकत नाही. तुम्ही खोटं बोलण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. अदानीच्या बंदरावर हजारो कोटीचे अंमली पदार्थ सापडले. अदानीला निर्धोक सर्व काही करता येईल, अशी मुभा दिली आहे. महाराष्ट्राच्या कामगार कायद्याला जगाने स्वीकारले, पण हे लोक स्वीकारायला तयार नाहीत.

Bhai Jagtap
Bhai Jagtap : एकीकडे ‘तारीख पे तारीख’ अन् येथे एकापाठोपाठ आठ सुनावण्या, भाई जगताप कडाडले!

रस्त्यावर उतरलेला माणूस विचार करत नाही..

शेतकऱ्यांचे तीन काळे कायदे केले, त्याच रात्री आणखी काही कायदे केले. अनऑर्गनाईज सेक्टर १३ टक्के होते, ते आता ६ टक्क्यांवर आले आहे. ईव्हीएम कितीही यांच्या दिमतीला असली, कितीही पैसा असला, तरी रस्त्यावर उतरलेला माणूस हा विचार नाही करणार. लोकशाहीचा गळा घोटणार असाल तर सामान्य माणूस ईव्हीएम फोडून टाकेल.

आम्ही आमच्या सरकारच्या काळात ईव्हीएम आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्या विरोधात सर्वात आधी आंदोलन करणारे किरीट सोमय्या (Kirit Somayya) होते. आज त्यांच्यात उन्माद दिसतो आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. ७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात (Maarashtra) यायची. ही गुंतवणूक येत होती, तोपर्यंत महाराष्ट्र एक नंबर होता. आज गुंतवणूक तिसऱ्या नंबर आहे, तर रोजगार निर्मितीही तिसऱ्याच नंबरवर राहायला पाहिजे, असेही भाई जगताप (Bhai Jagtap) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com