चरण वाघमारेंचा घणाघात; म्हणाले, भाजप हा लिमिडेट लोकांचा पक्ष !

भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मला निष्कासीत करवून घेतले. कारण भंडारा - गोंदियात त्यांना त्यांची जागा वाचवायची होती, असे चरण वाघमारे म्हणाले. (Charan Waghmare)
चरण वाघमारेंचा घणाघात; म्हणाले, भाजप हा लिमिडेट लोकांचा पक्ष !
Charan Waghmare on Chandrashekhar BawankuleSarkarnama

भंडारा : भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, येथे सामान कार्यकर्त्यांचा विचार केला जातो, असे भाजपचे नेते कितीही ओरडून सांगत असले, तरी त्यात तथ्य नाही. खरं म्हणजे भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष आहे, असा घणाघाती आरोप भाजपमधून निष्कासीत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला.

आज भंडाऱ्यांत (Bhandara) जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत चरण वाघमारे (Charan Waghmare) बोलत होते. ते म्हणाले, भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मला निष्कासीत करवून घेतले. कारण भंडारा - गोंदियात (Gondia) त्यांना त्यांची जागा वाचवायची होती. विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील राजकीय वातावरण खराब झाले होते. भाजप पक्षश्रेष्ठींनी वातावरण निवळण्यासाठी फुके यांना नागपूरला परत बोलविण्याचे ठरविले होते, मात्र फुके नागपूरला परत आल्यास आपले पद-आपली जागा धोक्यात येईल, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओळखले होते.

आमदार फुके यांना भंडारा - गोंदियात अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळेंनी मला निष्कासीत करण्याचा हा डाव खेळल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या सोबत जाण्यासाठी मी विरोध केला होता, असे सांगून मला निलंबित करण्याचा तो केवल बहाणा शोधण्यात आला होता, असा आरोप माजी आमदार वाघमारे यांनी भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चद्रकांतदादा पाटील यांना फुस लावून माझे निष्कासन करवून घेतल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजप कितीही ओरड करत असला की भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, पण हे सर्व धादांत खोटे असून भाजप हा लिमिडेट लोकांचा पक्ष असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.

Charan Waghmare on Chandrashekhar Bawankule
हजार गुन्हे दाखल झाले तरी माघार नाही! भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा जात होतो, तेव्हा ते नेत सांगायचे की, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण तसे नव्हते, तर केवळ काही मोजक्याच नेत्यांची पक्षात चालती आहे. त्यामुळे मी पार्लीमेंटरी बोर्डाचा राजीनामा दिला होता आणि मला नेता बनायचे नाही, असे मी ठासून सांगितले होते. त्यानंतर माझ्यासोबत काय झाले. हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे यापुढे मी विकास फाउंडेशन या माझ्या संघटनेच्या माध्यमातून बूथ लेव्हलपर्यंत पोहोचून काम करणार आहे आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरवेन, असेही चरण वाघमारे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.