नागपूर खंडपीठाचा चरण वाघमारे यांना तात्पुरता दिलासा, उपाध्यक्ष सभापतींची अटक टळली...

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर सभापती नंदकिशोर रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
Charan Waghmare, Bhandara
Charan Waghmare, BhandaraSarkarnama

भंडारा : नागपूर (Nagpur) खंडपीठाने माजी आमदार चरण वाघमारे यांना तात्पुरता दिलासा दिला असून भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेतील (ZP) भाजप फुटीर गटाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदकिशोर रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास का होईना या सदस्यांची होणारी अटक टळली आहे.

भाजप-सेना युतीची सरकार येताच माजी आमदार चरण वाघमारे यांना चांगलाच दणका मिळाला होता. त्यांच्या भाजप फुटीर गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर सभापती नंदकिशोर रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्यावर लागलेल्या ॲट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी भंडारा सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन नामंजूर केला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत माजी आमदार चरण वाघमारे यांच्या तिन्ही विश्वासू सदस्यांना अटक होणार, असे निश्‍चित मानले जात असताना नागपूर खंडपीठाने त्यांना तूर्त दिलासा दिला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी १० मे रोजी भाजपच्या दोन गटांत सभागृहातच हाणामारी झाली होती. मूळ भाजप राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करून सत्ता स्थापन करणार होती. मात्र भाजपमधून निष्कासित माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपले अत्यंत विश्वासू सहा जिल्हा परिषद सदस्य (फुटीर भाजप ५ व १ अपक्ष) यांच्या सह जिल्हा परिषदेत बहुसंख्येने असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दर्शविला. 10 मे रोजी सभागृहात अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान भाजप गटनेते विनोद बांते हे भाजप फुटीर सदस्यांना व्हीप द्यायला गेले असता भाजप गटनेते विनोद बांते व विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यात वाद झाला.

वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात भाजप फुटीर गटाने भाजपचे एकोडी किन्ही बांपेवाडाच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे व भागडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या प्रियंका बोरकर यांना मारहाण प्रकरणी भंडारा शहर पोलिसांत ॲट्रॉसिटी व महिला सदस्याच्या विनयभंग प्रकरणी नवनिर्वाचित उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर पंचायत समिती सभापती नंदकिशोर रहांगडाले आणि आंधळगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उमेश पाटील या तिघांवर गुन्हा दाखल झाला होता.

Charan Waghmare, Bhandara
भाजप नेत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालय म्हणाले, हा तर पब्लिसिटी स्टंट!

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे निष्कासित भाजप माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मदतीला धावून आले आणि आपले वकील आणि तत्कालीन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस स्व. शिशिर वंजारी यांच्यावर सदस्यांना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी टाकली होती. त्यांनीही जबाबदारी चोख बजावत तिघांनाही अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. मात्र ५ जुलैला अंतरिम जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीत भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केला होता. यासाठी भंडारा पोलिसांतर्फे सरकारी वकिलाने जामीन विरोधात जोरदार मुद्दे मांडल्याने न्यायालयाने या तिन्ही सदस्यांचा जामीन रद्द ठरविला होता.

येणाऱ्या दिवसांत नवनिर्वाचित उपाध्यक्ष संदीप ताले, तुमसर पंचायत समिती सभापती नंदकिशोर रहांगडाले आणि आंधळगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य उमेश पाटील यांना अटक होणार हे निश्‍चित झाले होते. हे सर्व राज्यात सत्ता परिवर्तन होताच भंडारा जिल्हा परिषदेत सत्तेचे फळ चाखण्याची स्वप्न बघणाऱ्या माजी आमदार चरण वाघमारे यांना कोर्टाचा मोठा दणका मानला जात होता. मात्र ह्या तिन्ही सदस्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतल्याने तूर्तास कोर्टाने त्यांचा अंतरिम जमीन मंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in