चरण वाघमारे हे नाना पटोलेंनाही भारी पडले!

भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत महत्वाचे खाते वाघमारेंच्या गटाला
चरण वाघमारे हे नाना पटोलेंनाही भारी पडले!
Charan Waghmare and Nana Patole BhandaraSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या (Bhandara Zilla Parishad) आज झालेल्या विषय समितीच्या खाते वाटपात माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) हे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना वरचढ ठरले. सभापती पदावरुन सुरु असलेल्या चढाओढीत अखेर भाजपचा फुटिर गट सरशी ठरत महत्वाचे अर्थ व बांधकाम सभापतीपद काबिज करण्यात चरण वाघमारे गटाला यश आले आहे.

सत्ता जरी नाना पटोले यांच्या हातात असली तरी खजिन्याची चावी मात्र चरण वाघमारे यांच्या हाती आहे. ज्या बांधकाम विभागाच्या खात्यावरुण काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या परंपरागत पक्षात स्थानिक पातळीवर वितृष्ठ आले तेच बांधकाम खाते काॅंग्रेस पक्षाने पर्यायाने नाना पटोले यानी चरण वाघमारे यांच्या फुटिर गटाला सहजरित्या दिले. त्यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या फुटीर गटासोबत केलेली हातमिळवणी आता काँग्रेसलाच जड गेल्याचे बोलले जात आहे.

Charan Waghmare and Nana Patole Bhandara
आमदार संजय शिंदे कोणाचे ऐकणार? अजितदादांचे की फडणविसांचे!

भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि 10 समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली.  बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते,मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपच्या फुटीर गटाने बांधकाम सभापती पद प्रतिष्ठेचे केले होते. अखेर मंगळवारच्या सभेत त्यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेतल. भाजपच्या फुटीर गटासोबत असलेले अपक्ष राजेश सेलोकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर रमेश पारधी यांना शिक्षण व आरोग्य विभाग देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्थायी व जलसंवर्धन विभाग राहणार आहे. यापूर्वी समाज कल्याण सभापतीपदी मदन रामटेके तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्वाती वाघाये यांची निवड करण्यात आली होती.

Charan Waghmare and Nana Patole Bhandara
राज्यसभा निवडणूक : MIM आमदाराला मोठी ऑफर!

जिल्हा परिषदेत बांधकाम व अर्थ खाते महत्वाचे असते. जो पक्ष या खात्यावर आपली दावेदारी करतोच त्यांचेच वर्चस्व जिल्हा परिषदेत मानले जाते. त्यामुळे या वर्चस्वाच्या लढाई स्थानिक पातळीवर दोन परंपरागत मित्र पक्ष एकमेकांचे शत्रू झाले. मागच्या जिल्हा परिषदेच्या कालावधीत आम्हला बांधकाम विभाग देणाचे आश्वासन पूर्ण न केल्याच्या आरोप करत राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा हात सोडला होता. सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या काॅंग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी चरण वाघमारेंच्या भाजपच्या फुटिर गटाशी हातमिळवणी करत जिल्हा परिषद काबिज केली. काॅंग्रेस सर्वाधिक जागा प्राप्त करून ही महत्वपूर्ण बांधकाम व अर्थ खाते मिळवू शकला नाही. याचे दुःख जरी कांग्रेस कार्यकर्त्यांना असले तरी राष्ट्रवादीला मात्र गुदगुल्या होऊ लागल्या आहे हे मात्र खरे आहे.

दरम्यान भंडारा जिल्हा परिषदेत माजी आमदार चरण वाघमारे `किंग मेकर` ठरले असल्याने भंडारा जिल्ह्यात परिषदेत जर सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो केवळ चरण वाघमारे गटाला झाला आहे. कारण चरण वाघमारे गटाने एक उपाध्यक्ष व एक सभापति पद मिळवून घेतले आहे. यात चरण वाघमारे यांच्या राजकीय चालीने कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in