Chandur Railway APMC News : सभापती निवडीपूर्वी प्रा. जगतापांनी घेतला संचालकांचा वर्ग, सभापतीपदी आरेकर बिनविरोध !

Virendra Jagtap : नवनियुक्त संचालकांची बैठक माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरी पार पडली.
Chandur Railway APMC
Chandur Railway APMCSarkarnama

Amravati District's Chandur Railway APMC Election News : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश आरेकर, तर उपसभापतिपदी रवींद्र देशमुख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. त्यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकासह माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप उपस्थित होते. (This process was carried out in the market committee hall)

प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने बाजार समितीच्या निवडणुकीत (Election) १८ पैकी १७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली होती. शुक्रवारी (ता. १९) झालेल्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजता सर्व नवनियुक्त संचालकांची बैठक माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या घरी पार पडली.

बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने गणेश आरेकर आणि रवींद्र देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर बाजार समितीत (APMC) जाऊन प्रशासकीय प्रक्रियेद्वारे सभापती व उपसभापतिपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर सर्व काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले. प्राधिकृत अधिकारी प्रीती धामणे आणि एम. एस. मनसुटे यांनी प्रक्रिया पार पाडली.

यावेळी नवनियुक्त संचालकांसह सुभाष अग्रवाल व श्यामसुंदर पनपालिया, सुरेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रभाकर वाघ, हरिभाऊ गवई, तेजस भेंडे, पूजा श्रीनिवास देशमुख व वर्षा वाघ, वसंत गाढवे, अतुल चांडक, मंगेश धावडे, राजेंद्र राजनेकर, रामेश्वर वानखडे, रावसाहेब शेळके यांच्यासह अमोल होले, हर्षल वाघ, प्रदीप वाघ, भानुदास गावंडे, शिट्टू सूर्यवंशी, वैभव गायकवाड, निवास सूर्यवंशी, गोविंद देशमुख, प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.

Chandur Railway APMC
Amravati APMC Election : यशोमतींचे वर्चस्व, औपचारिकताच ठरली सभापती-उपसभापतीची निवडणूक !

प्रा. जगतापांनी घेतला संचालकांचा वर्ग..

सभापती व उपसभापती यांच्या निवडीपूर्वी माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी सर्व संचालकांचा वर्ग घेत त्यांना बाजार समिती प्रशासन चालविताना शेतकरी हिताची कामे करा, सर्व संचालकांनी महत्त्वाच्या वेळी बाजार समितीत उपस्थित राहणे बंधनकारक असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासोबतच त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेकडे प्राधान्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्या.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in