
Amravati District's Chandur Bazar APMC Election : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवे सभापती म्हणून राजेंद्र याऊल यांची निवड करण्यात आली, तर उपसभापतिपदी गजेंद्र गायकी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बाजार समितीवर प्रथमच बारी समाजाच्या व्यक्तीला सभापती होण्याचा मान मिळाला.(A person from Bari community got the honor of being the chairman)
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार गटाची एकहाती सत्ता येऊन संपूर्ण १८ उमेदवार निवडून आले. यात माजी सभापती मंगेश देशमुख हे ग्रामपंचायत मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. तसेच राजेंद्र याऊल, गजेंद्र गायकी, सतीश मोहोड, नंदकिशोर वासनकर, रामदास भोजने, आश्विन भेटाळू, बाळासाहेब वाकोडे, मनोज वाटाणे, माधवराव धोंड, अनिल खैरकार, विनोद राऊत, संदीप चरपे, मिना देशमुख, ललिता पोहोकार, अमोल लंगोटे, मनोज नांगलिया, लतीफ खान कादर खान हे संचालकपदी निवडून आले.
या निवडणुकीत प्रहारच्या (Prahar) शेतकरी पॅनलने मुसंडी मारून सहकार पॅनलला चांगलीच धोबीपछाड दिली. गेल्या ४९ वर्षात पहिल्यांदाच बाजार समितीत सर्व संचालक एकाच गटाचे निवडून आले. यात शिरसगाव कसबा येथील प्रहारचे खंदे समर्थक व बारी समाजाचे एकमेव निवडून आलेले संचालक राजेंद्र याऊल यांचासुद्धा समावेश होता.
तालुक्यात बहुसंख्येने असलेला बारी समाज आजवर बाजार समितीच्या (APMC) सभापतिपदापासून वंचित राहिला होता. यामुळे आमदार बच्चू कडू यांनी सभापतिपदी राजेंद्र याऊल यांची नियुक्ती करण्याचे ठरविले. त्यांच्या नावाला सर्व संचालकांनी समर्थन दर्शविल्याने त्यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. तसेच प्रहारचे सर्वात जुने कार्यकर्ते व बच्चू कडू यांचे खंदे समर्थक असलेले गजेंद्र गायकी यांची उपसभापतिपदी निवड झाली.
सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक (Election) होताच प्रहार कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) स्वतः उपस्थित होते. तसेच प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले, तुषार ऊर्फ बबलू देशमुख, अकबर अली, श्याम कडू, मनीष एकलारे, दत्ता किटुकले, मोहन विधळे, अजय राऊत, विनोद जवंजाळ, शरद तायडे, मंगेश अर्डक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.