Chandrashekhar Bawankule बच्चू कडूंना रुग्णालयात भेटून करणार ‘ही’ विनंती !

BJP : डॉ. रणजीत पाटील यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला.
Bacchu Kadu and Chandrashekhar Bawankule
Bacchu Kadu and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. रणजीत पाटीलच निवडून येणार, असे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी सांगितले.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या एका समर्थकावर आज ईडीने छापे घातले, याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, तपास यंत्रणा कधी जात, धर्म पाहून कारवाई करत नाही. तपास यंत्रणा पुराव्याशिवाय धाडीही टाकत नाही. कर नाही तर डर कशाला? अधिकाऱ्यांनी मागितलेली कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांना दाखवा. त्यात भिण्याची कुठलीही गोष्ट नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचीही चौकशी झाली, पण आम्ही त्याचा बागुलबुवा केला नाही.

राजकीय नेत्यांनी चौकशीला घाबरू नये. चौकशीला सामोरे जावे, त्याचा बागुलबुवा करून राजकारण करू नये, असा सल्लाही बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला. अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सत्तेत सहभागी असूनही मेस्मा या संघटनेसोबत मिळून किरण चौधरी हा उमेदवार उभा केला आहे. त्याचा भाजपला फरक पडणार का, असे विचारले असता, फारसा फरक पडणार नाही. पण तरीही मी बच्चू कडूंना विनंती करणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Bacchu Kadu and Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काय कारेमोरेजी... तुमच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाहीये !

बच्चू कडू यांचा आज सकाळी अमरावतीमध्ये अपघात झाला. तेथे खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला आणण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात जाऊन भेट घेणार आणि त्यांना विनंती करणार आहे की, त्यांनी या निवडणुकीत वेगळे जाऊ नये, तर आमच्यासोबत लढावे. विनंतीला ते मान देतील, असा विश्‍वास असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता, विरोधक संपले पाहिजे हे संस्कृती आमची नाही, तर ती काँग्रेसची संस्कृती आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in