चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणलीय : गडकरींची जोरदार फटकेबाजी

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूरमध्ये सत्कार
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

नागपूर : चंद्रशेखर बावनुकळे (Chandrashekhar Bavankule) यांचा जीवनपट हा रिक्षा चालकापासून सुरु होतो. बाकीचं काही सांगत नाही. पण, बायकोसुद्धा त्यांनी पळवून आणली आहे. तुम्हाला माहिती नसेल त्यांची पत्नी ही कुणबी समाजाची, तर ते तेली समाजाचे आहेत. ते कसं घडवून आणलं, ते मला एकट्याला सांगतील. हे तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचे आहे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये, असा गौप्यस्फोट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ज्येष्ठ नेत्यांना सल्लाही दिला. (Chandrasekhar Bawankule was felicitated in Nagpur for being elected as BJP state president)

चंद्रशेखर बावनुकळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागपूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. त्यात गडकरी बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेते उपस्थित होते.

Nitin Gadkari
उद्धव ठाकरेंना ‘तो’ निर्णय घेणे अडचणीचे वाटले असावे; पण शिंदेंनी वाट करून दिली अन्‌..

गडकरी म्हणाले की, आपल्याबरोबर काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष झाले, हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री जन्माला येत नाही. एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी असणे हा काही गुन्हा नाही. त्यांनाही अधिकार आहे आणि त्यांनीही आपल्या कर्तृत्वाने मोठी जागा मिळवयाला कोणतीही अडचण नाही.

Nitin Gadkari
आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील मानेंचे डोळे पाणावले; पण...

बावनकुळे यांचे जीवन संघर्षमय होतं. त्यांचे वडिल, भाऊ, बहिण दयनीय परिस्थिती होती. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने त्यांची जमीन घेतली होती. त्याचा मोबदला, जागा मिळत नव्हता. त्यात काही राजकीय अडचणी होत्या. त्यावेळी मुंडे साहेब मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून बावनकुळे यांचे काम झाले. तेथून त्यांनी छत्रपती सेनेचे काम सुरू केले. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन सुरू केले. त्यावेळी भाजपची नागपूर जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघात चांगली मेहनत घेऊन तो बांधला. ते प्रथम जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी कामठी मतदारसंघात मोठे परिश्रम घेतले. बावनकुळे हे संपूर्ण झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. अन्यायाविरोधात लढून जनतेला न्याय देण्याचे काम केले.

Nitin Gadkari
एकनाथ शिंदे गटाला केंद्रातही सत्तेचा वाटा; ‘या’ खासदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपद!

गडकरी यांनी सांगितले की, आमदार झाल्यानंतर त्यांना ऊर्जामंत्रीपद मिळाले. त्या ठिकाणाही त्यानं उत्तम काम केले. रत्नागिरीपासून ते चंद्रपूरपर्यंत सर्वजण बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक करायचे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वीजपंपांचा अनुशेष बावनकुळे यांनी भरून काढला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सांगू नये; पण बावनकुळे यांच्यामध्यं एवढं कर्तृत्व आहे की ते पुरुषाला बाई बनवतील आणि बाईला पुरुष बनवतील. कोणती फाईल कशी करतील, हे सांगता येत नाही. कुठल्या आमदाराचे पत्र घेतले, कुणाचा निधी होता, तो कुठे गेला, कोणत्या गावांत घुसला, याचा पत्ताच लागत नाही. यांचं कारण त्यांच्याकडे जनतेचे प्रश्न सोडविण्याची ओनरशीप आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचो. ते आजारी होते, त्यांनी कधीही देवेंद्रला राजकारणात घ्या, असं म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीसांना हे माहिती नव्हतं की, मी जेव्हा गंगधारपंतांना भेटायला गेलो. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुमची प्रकृती आता चांगली नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात काम करण्याची संधी द्या. त्यांनी सांगितले की, माझी काही अडचण नाही. पण तुम्ही त्याच्याशी बोला. त्याची इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राजकारणात आले. त्यांना वडिलांचा वारसा होता. पण, आपल्या कर्तृत्वावर नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्रीपद त्यांनी मिळविले. त्यामुळे आपल्या पक्षातील आमदार, खासदारांनी माझ्या मुलाला एक संधी द्या, असे म्हणू नये. एखाद्याच्या मुलाला जनतेने म्हटलं तिकिट द्या, तर त्याला बोलावून द्यायचं. पण, त्याच्या आईवडिलांच्या म्हणण्याकरिता द्यायचं नाही, असेही गडकरी यांनी पक्षाच्या कामाबाबत कार्यकर्त्यांना सजग केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com