Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule and Ajit PawarSarkarnama

Chandrashekhar Bawankule यांनी अजित दादांना पुन्हा डिवचले; म्हणाले, होय धर्मवीरच !

Winter Session : कोरोना काळानंतर झालेले हे पहिलेच अधिवेशन. अनेक कारणांनी चर्चेत राहिले.

Chandrashekhar Bawankule Vs Ajit Pawar : नागपुरात काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९मध्ये एक अधिवेशन नागपुरात (Nagpur) झाले होते. त्यानंतर कोरोना काळानंतर झालेले हे पहिलेच अधिवेशन. अनेक कारणांनी चर्चेत राहिले. शिंदे-फडणवीस गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रोजच संघर्ष बघायला मिळाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुन्हा चर्चा झडणार, अशी शक्यता आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवारी, २८ डिसेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार (Ajit Pawar) खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंचा हल्ला परतवून लावला होता. त्या दिवशी पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला होता. विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटील (Jayant Patil) यांना द्यायला हवं होतं. येत्या २०२४ निवडणुकीत अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल," असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना चिमटे काढले होते. त्यानंतर अजित पवारांनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी विधानभवन परिसरात त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

अजित पवार म्हणाले, "बावनकुळे यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाही," "आम्ही राजकारणातून संन्यास घेतलेला बरा," असा खोचक टोला अजित पवारांनी बावनकुळे यांना लगावला. तो विषय तेथेच संपला असा वाटत असताना काल अधिवेशन संपल्यानंतर बावनकुळेंनी आज ट्विट करीत पुन्हा अजित दादांना डिवचले आहे. काल अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचा ट्विटरवरून समाचार घेतला आहे. ‘स्वार्थासाठी सेटलमेंट करणाऱ्यांना काय कळणार, धर्मासाठी त्याग काय असतो ते? संभाजी महाराज धर्मवीर होते.’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule : अजितदादांंकडून 'करेक्ट कार्यक्रमा'चा इशारा, बावनकुळे म्हणाले,''ते घाबरलेत....''

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला, तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्विट करून अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा, असे नमूद केले आहे. बावनकुळे यांनी ट्विट करीत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावर अजित पवारांकडून काय प्रतिक्रिया येते आणि हा वाद कुठे जाऊन थांबणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in