Chandrashekhar Bawankule : अजितदादांंकडून 'करेक्ट कार्यक्रमा'चा इशारा, बावनकुळे म्हणाले,''ते घाबरलेत....''

Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar: अनेक बड्या बड्या लोकप्रतिनिधींचे राजकारण संपलं आहे. त्यामुळे...
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest NewsSarkarnama

Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मंगळवारी विरोधकांवर टीका करताना चांगलीच फटकेबाजी देखील केली. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचाही समाचार घेतला.

पवार म्हणाले, भाजपचे नेते बारामतीत येऊन घड्याळ बंद होणार, पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा वल्गना करतात. पण बारामतीत आमचं काम आहे. मात्र, मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल अशा शब्दांत बावनकुळेंना इशारा दिला आहे. त्याला आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहेत. (Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar)

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
Rupali Patil-Thombare : रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध; शहराध्यक्षांनीच टोचले कान !

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, अजित पवार घाबरले आहेत, हे त्यांच्या बोलण्यातूनच दिसतं आहे. बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नव्हे, बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नव्हे असा चिमटाही बावनकुळे यांनी अजित पवारांना काढला.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar Latest News
Anil Deshmukh News : देशमुख जेलमधून सुटणार; पण न्यायालयाच्या 'या' आदेशामुळे होणार अडचण

तसेच बारामती लोकसभेच्या मतदारसंघात पवार कुटुंबियाविषयी लोकांमध्ये असंतोष आहे. अनेक बड्या बड्या लोकप्रतिनिधींचे राजकारण संपलं आहे. त्यामुळे राजकारणाच्या भ्रमात कुणीही राहू नये. पवार कुटुंबियांचा करेक्ट कार्यक्रम बारामतीकर येणाऱ्या काही दिवसातच करतील असेही बावनकुळेंनी यावेळी सांगितले.

लोकशाहीमध्ये शेवटी कोणत्याही उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीही बारामती लोकसभेचा दौरा केला होता. त्यावेळी बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नव्हे हे लक्षात आले असा टोलाही बावनकुळेंनी पवारांना लगावला.

अजित पवार काय म्हणाले होते...?

राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते अलिकडे सप्टेंबर महिन्यात बारामतीत आले. त्यांनी सांगितलं, बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल.

महाराष्ट्राला माहितीय, मी कुणाला चॅलेंज दिलं तर कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. त्यांना म्हणावं थोडं दमानं. फार गाडी वेगात चालली आहे. वेगाने गाडी गेली तर अपघात होईल अशा शब्दांत अजित पवारांनी बावनकुळेंसह फडणवीसांनाही सबुरीचा सल्ला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com