Chandrashekhar Bawankule : राज्यपालांच्या वक्तव्यावर बावनकुळेही स्पष्टच बोलले...

Chandrashekhar Bawankule News : ''त्या' वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही, पण...'
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule News : भाजप नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन काम करतं. त्यांच्या इतिहासाचं महत्व कोणीही कमी करु शकत नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची सुत्रं स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या विधानावरुन कोंडीत पकडण्याचं काम कोणीही करू नये, असं भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस आणि ठाकरे गटाने राज्यभरात राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलने केली. या पार्श्वभूमीवरच बावनकुळेंनी राज्यपालांच्या या विधानावरून सारवासारव करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Chandrashekhar Bawankule
राज्यपालांविरोधात रोष थांबेना; पिंपरी काँग्रेस पाठवणार च्यवनप्राश

बावनकुळे म्हणाले, ''राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी वयाच्या 79 व्या वर्षी शिवनेरीवर पायी गेले. त्यामुळे एखाद्या वक्तव्यावरून त्यांना कोंडीत पकडण्याचं काम कोणीही करू नये, मात्र जे वक्तव्य झालं त्याच कोणीही समर्थन करत नाही. तर भाजपचे 18 कोटी कार्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करतात, असं ते म्हणाले.

''राहुल गांधींनी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल टीका केली. तरी देखील आदित्य ठाकरेंनी त्यांची गळाभेट घेतली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काळजी असती तर त्यांनी गळाभेट घेतली नसती'', असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com