चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही नियमाप्रमाणे आक्षेप घेतला…

कॉंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांचा तो आक्षेप आहे. पण सुधीर मुनगंटीवार यांच्या बॅलेट पेपरला आपण हात लावलाच नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही नियमाप्रमाणे आक्षेप घेतला…
Chandrashekhar Bawankule News, Rajyasabha Election 2022 News Sarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीमधील मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. त्याचे मतदान बाद करण्याचीही मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आम्ही आक्षेप घेतला असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule News)

यासंदर्भात बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, आम्ही नियमांप्रमाणे आक्षेप घेतला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत कॉंग्रेसने जो आक्षेप घेतला आहे, त्याचे काय करायचे ते निवडणूक आयोग (Election Commission) बघेलच. त्यांनी अत्यंत चुकीचा आक्षेप घेतला आहे. लवकरच तो आक्षेप निकाली निघेल. कॉंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांचा तो आक्षेप आहे. पण सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांच्या बॅलेट पेपरला आपण हात लावलाच नाही, असे बावनकुळे (MLC Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. आमचे उमेदवार धनंजय महाडिक निश्‍चितपणे विजयी होतील, असेही ते म्हणाले.

याच विषयावर बोलताना नाना पटोले म्हणाले, भाजपने आधी आमच्या दोन मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर कुठे ते चूप बसले. त्यांनी बाभळीची झाडे लावली आहेत. आता त्यांच्यापुढे काटेच निघणार आहेत. आमच्या मतदानावर आक्षेप घेऊन त्यांनी आज विधान भवनातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनाच विचारले पाहिजे की, मुनगंटीवाराचं काय झाले? तेव्हाच सर्व प्रकार कळेल.

Chandrashekhar Bawankule News, Rajyasabha Election 2022 News
चंद्रशेखर बावनकुळे येऊन जाताच नगरमधील भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर

या निवडणुकीत खुली मतदान पद्धती होती. पक्षाच्या आमदारांनी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांना मते दिली. मतदान व्यवस्थित झाले आहे. चुकीच्या बातम्या पेरण्याचे काम भाजप करत आहे. राज्याची बदनामी करण्याचे काम करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून अशी चूक होणे अपेक्षित नव्हते. पण हे घडले आहे आणि ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हारण्याच्या वाटेवर आहे, म्हणून ते वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in