चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तम काम केलंय, ते अडचणीत येऊच शकत नाहीत...

देशाचं सत्य एखाद्या सिनेमातून पुढं येत असेल, तर काही लोकांना मिरची का लागते? कारण या लोकांची त्यावेळची भूमिका किती देशविरोधी होती ,याचा परदाफाश होतो, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : आमदार बावनकुळेंची (Chandrashekhar Bawankule) कुठलीही चौकशी होत नाहीये, तर त्यावेळी आम्ही जे प्रकल्प राबविले, त्याची चौकशी राज्य सरकार करणार आहे. महत्वाचं म्हणजे, हे प्रकल्प मंत्री करत नाही, तर कंपन्या करत असतात, येवढी साधी बाब राज्य सरकारला (Mahavikas Aghadi Government) कळायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या तीन कंपन्यांनी ते प्रकल्प केले. त्यामुळे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत येण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. बावनकुळेंनी उत्तम काम केलेले आहे, ते अडचणीत येऊच शकत नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज म्हणाले.

आम्ही त्यावेळी जे प्रकल्प राबविले, त्याचा महाराष्ट्राला फायदाच झालेला आहे, असेही फडणवीस म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष होणार का, असे विचारले असता फडणवीसांनी म्हणाले, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव परत पाठवला. पण हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. हा संवैधानिक मुद्दा आहे. त्यामुळे आपण घाईगडबडीने ही निवडणूक घेता कामा नये, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच ती घेतली पाहिजे, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली असावी.

करू द्या, किती गुन्हे दाखल करतात ते..

प्रवीण दरेकरांवर राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, त्यांना जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत, ते करू द्या. आम्ही त्याला घाबरत नाही. आम्ही संघर्ष करू, त्यांना उघडं पाडू, पण भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचं बोलणं बंद होणार नाही. ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू पाहात आहेत. पण आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही.

त्यांना मिरची का लागते?

काश्‍मीर फाईल्सच्या संदर्भात बोलायचं झालं तर, महाराष्ट्रातलं सरकार हे कॉंग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्‍मीरबाबत बाळासाहेब ठाकरे यांची असलेली भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरे सरकारचं वर्तन, यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. काश्‍मीरची अवस्था काय होती, हे ज्यांनी बघितलं आहे, त्यांनाच माहिती आहे. विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात वयाच्या १८ व्या वर्षी मी काश्‍मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. तेथे झालेले अत्याचार मी जवळून बघितले आहेत. आपल्या देशाचं सत्य एखाद्या सिनेमातून पुढं येत असेल, तर काही लोकांना मिरची का लागते? कारण या लोकांची त्यावेळची भूमिका किती संशयास्पद, जनविरोधी आणि देशविरोधी होती याचा परदाफाश होतो, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेऊ! असं फडणवीस पवारांना का म्हणाले?

त्या नेत्यांचे चेहरे उघडं पडत आहेत..

संजय राऊतांना याबाबतीत काय सत्य माहिती आहे? त्या काळात ते कधी काश्‍मीरला गेले होते का? जे त्यांना माहिती नाही, ते सत्य या सिनेमाच्या माध्यमातून देशासमोर येत आहे आणि राऊत सध्या ज्या लोकांची वकिली करीत आहेत, त्या लोकांचे चेहरे उघडे पडत आहेत. त्यामुळे संजय राऊत बिथरले आहेत. या सिनेमाने सत्य देशापुढे आणले आहे, त्यामुळे मी या चित्रपटाच्या निर्मात्याचं अभिनंदन करतो. काश्मिरी पंडितांवर तेव्हा अत्याचार होत होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ५ टक्के आरक्षण महाराष्ट्रात त्यांना दिले होते, ते जाज्वल्य होतं आणि आज तेच सत्य सिनेमातून दाखवलं जात आहे, तर तुम्हाला त्रास होतो. येवढे का व कसे बदलले हे लोक, असा प्रश्‍न फडणवीसांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com